IPL 2025 Playoffs : गुजरातच्या पराभवानंतर टॉप-२ ची रेस रंजक! ‘या’ सामन्यानंतर चित्र होणार स्पष्ट

IPL 2025 Playoffs Top 2 Race Scenario : आयपीएल २०२५ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव केला. या विजयासह, चेन्नई सुपर किंग्जने चालू हंगामाला निरोप दिला. त्याच वेळी, गुजरात टायटन्सच्या या पराभवानंतर, त्यांच्यासाठी टॉप -२ समीकरण बदलत आहे. आता गुजरातला टॉप-२ मध्ये राहण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल. त्याच वेळी, आरसीबीला आता अव्वल स्थानावर राहण्याची चांगली संधी असेल. आयपीएल २०२५ टॉप-२ मध्ये राहण्याच समीकरण काय आहे? जाणून घेऊया.
आयपीएल २०२५ प्लेऑफ टॉप २ रेस –
गुजरात टायटन्सने लीग स्टेज १८ गुणांसह संपवला. जर गुजरातला आता प्लेऑफच्या सामन्यांपूर्वी टॉप-२ मधील स्थान निश्चित करायचं असेल, तर त्यासाठी आरसीबी आणि पंजाब किंग्जला त्यांचा शेवटचा सामना जिंकावा लागेल. पंजाब किंग्जचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. त्याच वेळी, आरसीबीचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे.
The 5⃣-time champs sign off from #TATAIPL 2025 with a convincing win 💛#CSK register a HUGE 83-run win over #GT 👏
Updates ▶ https://t.co/P6Px72jm7j#GTvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/ey9uNT3IqP
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
एमआय विरुद्ध पीबीकेएस सामन्यानंतर चित्र स्पष्ट होणार –
आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात ६९ वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर आपल्याला टॉप २ संघांबद्दल समजेल. जर एमआयने पंजाबला हरवले, तर पीबीकेएस टॉप २ मध्ये पोहोचू शकणार नाही. हा सामना जिंकणारा संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये पोहोचेल.
हेही वाचा – GT vs CSK : गिल-सुदर्शनने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय जोडी
आरसीबीकडे चांगली संधी –
आता आरसीबीकडे अव्वल स्थानावर पोहोचण्याची सर्वोत्तम संधी आहे. जर आरसीबीने लखनौला हरवले तर ते पहिल्या क्वालिफायरमध्ये पोहोचेल असे समीकरण आहे. दुसरीकडे, जर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा पराभव केला, तरही आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहून विजयासह लीग स्टेज पूर्ण करेल. दुसरीकडे, जर लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला तर गुजरात पहिल्या क्वालिफायरमध्ये आपले स्थान निश्चित करेल.





