Shreyas Iyer Catch : श्रेयस अय्यरचा ‘हवेत’ झेप घेत चमत्कार! हार्दिकचा असा कॅच घेतला की रोहित-सूर्याही बघतच राहिले; पाहा VIDEO
Shreyas Iyer Catch : या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने सीमा रेषेवर घेतलेला एक अद्भूत झेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Shreyas Iyer catch video viral : आयपीएल २०२६ च्या २४ व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने आले होते. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने सीमा रेषेवर हार्दिक पंड्याचा घेतलेला एक अद्भूत झेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सच्या डावातील १८ वे षटक सुरू असताना ही थरारक घटना घडली. मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागल्याने तो हवेत उंच उडाला. सीमारेषेवर असलेल्या श्रेयस अय्यरने चित्त्याच्या वेगाने धावत येत हवेत झेप मारुन चेंडू पकडला, पण तो सीमारेषेच्या बाहेर जाणार हे लक्षात येताच त्याने हवेतच चेंडू आतल्या बाजूला फेकला. तिथेच उभ्या असलेल्या झेव्हियर बार्टलेटने हा झेल पूर्ण केला.
SHREYAS IYER, WHAT HAVE YOU DONE!! 🤯
🎥 One of the best catches you would see in the #TATAIPL history 🔥🔥
Updates ▶️ https://t.co/Fn2dxJ4zYR#KhelBindaas | #MIvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/6EKgHR82cL
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
डगआऊटमधील रोहित शर्माची ‘ती’ रिॲक्शन व्हायरल –
REACTION of SARPANCH IYER💥#IPL #MIvsPBKS #IPL2026 #PBKSvsMI #ShreyasIyer pic.twitter.com/YARIBm6JyC
— Nik Learning 🙂 (@NikLearning) April 16, 2026
श्रेयस अय्यरची ही चपळाई पाहून संपूर्ण स्टेडियम स्तब्ध झाले. मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये बसलेले रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या चेहऱ्यावरील भाव सर्व काही सांगून जात होते. अय्यरने ज्या पद्धतीने हा कठीण झेल सोपा केला, ते पाहून रोहित शर्माही अचंबित झाला. स्वतः फलंदाज हार्दिक पंड्यालाही (१४ धावा) आपण बाद झालो आहोत यावर विश्वास बसत नव्हता. श्रेयसने हा झेल पूर्ण केल्यानंतर प्रेक्षकांकडे पाहून जो जल्लोष केला, त्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
क्विंटन डिकॉकचे तुफानी शतक –
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. मुंबईच्या या डावाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे क्विंटन डिकॉक. डिकॉकने केवळ ६० चेंडूत नाबाद ११२ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला युवा नमन धीरने ३१ चेंडूत ५० धावा करून मोलाची साथ दिली. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, जो डिकॉकच्या फलंदाजीमुळे काहीसा जड गेल्याचे दिसले.





