GT vs CSK : गिल-सुदर्शनने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय जोडी

GT vs CSK Shubman Gill and Sai Sudharsan pair creates History : शुबमन गिल आणि साई सुदर्शन या ‘शुद्ध देसी जोडी’ने आयपीएल २०२५ मध्ये कमाल केली आहे. त्यांनी एकत्रितपणे ९०० हून अधिक धावा करत इतिहास रचला. आयपीएलच्या एका हंगामात ९०० धावा करणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली. गुजरात टायटन्सचा कर्णधार गिल आणि सुदर्शन यांनी सलामीवीर म्हणून शानदार फलंदाजी केली.
मात्र, रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्यांना चांगली सुरुवात करता आली नाही, ज्यामुळे त्यांनी ८३ धावांनी पराभव पत्करावा लागला.तरीही त्यांनी अहमदाबादच्या मैदानावर २४ धावांची भागीदारी करत हा विक्रम नोंदवला. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २३१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सचा संघ १८.३ षटकांत १४७ धावांत गारद झाला. गुजरात टायटन्सला २० गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान निश्चित करण्यात अपयश आले.
The 5⃣-time champs sign off from #TATAIPL 2025 with a convincing win 💛#CSK register a HUGE 83-run win over #GT 👏
Updates ▶ https://t.co/P6Px72jm7j#GTvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/ey9uNT3IqP
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
गिल-सुदर्शन जोडीने रचला इतिहास –
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्यांच्या यादीत गिल आणि सुदर्शन दुसऱ्या स्थानावर आहेत. दोघांनीही सध्या ९०९ धावा जोडल्या आहेत. एका हंगामात सर्वाधिक भागीदारी धावांचा विक्रम संयुक्तपणे कोहली-डिव्हिलियर्स आणि कोहली-डू प्लेसिस यांच्या नावावर आहे. आरसीबीचा स्टार फलंदाज कोहलीने आयपीएल २०१६ मध्ये डिव्हिलियर्ससोबत ९३९ धावा जोडल्या होत्या. यानंतर कोहली-डू प्लेसिस यांनी २०२३ मध्ये ९३९ धावांची भागीदारी केली होती.
हेही वाचा – GT vs CSK : चेन्नईने आपल्या हंगामाचा शेवट केला गोड; गुजरातच्या टॉप-२ मध्ये पोहोचण्याच्या आशांना बसला धक्का
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावांची भागीदारी करणाऱ्या जोड्या :
- ९३९ – कोहली-डिव्हिलियर्स (२०२१६, आरसीबी)
- ९३९ – कोहली-डु प्लेसिस (२०२३, आरसीबी)
- ९०९ – गिल-सुदर्शन (२०२५, जीटी)*
- ८४९ – गायकवाड-कॉनवे (२०२३, सीएसके)
- ७९१ – वॉर्नर-बेअरस्टो (२०१९, एसआरएच)





