IPL 2025 : आयपीएलपूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, गोलंदाजी प्रशिक्षकपदी ‘या’ दिग्गजाची केली नियुक्ती…

IPL 2025 (Delhi Capitals) : दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी माजी भारतीय वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आगामी टप्प्यासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. 41 वर्षीय मुनाफ मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी आणि क्रिकेट संचालक वेणुगोपाल राव यांच्यासोबत काम करेल.
Old-school grit 🤝 Winning mindset
Welcome to DC, legend 🥹💙 pic.twitter.com/d62DSCcqNR
— Delhi Capitals (@DelhiCapitals) November 12, 2024
साल 2018 मध्ये व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला मुनाफ त्याच्या कारकिर्दीत प्रथमच कोचिंगची जबाबदारी स्वीकारणार आहे. आयपीएल 2024 नंतर मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगसह फ्रेंचायझी सोडलेल्या जेम्स होप्सची जागा मुनाफ पटेल घेईल.
मुनाफने सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 86 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 125 विकेट घेतल्या आहेत. तो 2011 मध्ये भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. याशिवाय तो आयपीएल विजेत्या राजस्थान रॉयल्स (2008) आणि मुंबई इंडियन्स (2013) संघाचा देखील भाग होता. दिल्ली कॅपिटल्सने आगामी हंगामासाठी अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल या चार खेळाडूंना कायम ठेवले आहे.





