IND vs SA 3rd T20 (सेंच्युरियन) – दुसऱ्या लढतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाजाकडून बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० लढतीमध्ये भारतीय फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर २००९ पासून भारताने केवळ एकच लढत खेळली असून २०१८ साली झालेल्या या लढतीमध्ये भारताला ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या संघातील हार्दिक पांड्या हा एकमेव खेळाडू सध्या संघात आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
वेळ : सायं 8.30 पासून
ठिकाण : सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन
भारताचा सलामीवीर संजू सॅमसनने पहिल्या लढतीत धडाकेबाज शतकी खेळी करताना भारताला दर्जेदार विजय मिळवून दिला होता. मात्र नावाजलेली भारतीय फलंदाजी दुसऱ्या लढतीत पत्त्यासारखी कोसळली. वरुण चक्रवर्तीने पाच बळी घेताना सामना आवाक्यात आणला होता, मात्र ट्रिस्टन स्टब्स व गेराल्ड कोएत्झी यांनी झुंजार खेळी करताना भारताला पराभवाचा धक्का दिला. दुसऱ्या लढतीतील पराभवाने मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.
पहिल्या लढतीत चमकलेली भारतीय फलंदाजी दुसऱ्या लढतीत साफ ढेपाळली. हेच भारातासाठी चिंतेचे वातावरण आहे. गंमत म्हणजे, सुपरस्पोर्ट्स पार्कची खेळपट्टी देखील गब्बाप्रमाणेच वेगवान व चेंडूला उसळी देणारी आहे. दुसऱ्या लढतीमध्ये भारतीय फलंदाजांना आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे भारताला ६ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १२४ धावांपर्यंत मजल मारता आली होती. सलामीवीर अभिषेक शर्मा सातत्याने अपयशी ठरत आहे. संघ व्यवस्थापनाने त्याला राखीव खेळाडूंमध्ये बसविण्यापूर्वी शर्माला चांगली आणि मोठी खेळी करावीच लागणार आहे. याचबरोबरीने मधल्या फळीत रमणदीपला खेळाडूं तिलक वर्माला सलामीला खेळविण्यात येण्याची शक्यता आहे.
सूर्या, पंड्या अन रिंकू
भारताचे वरिष्ठ फलंदाज असलेले कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या व रिंकू सिंग यांना चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. कर्णधार सूर्या व हीटिंग स्टार रिंकू सिंग हे सध्या फॉर्मसाठी झगडत आहेत. दुसऱ्या लढतीत हार्दिक पंड्याने ३९ धावासाठी तब्बल ४५ चेंडूचा सामना करावा लागला. पहिला चौकार मारण्यासाठी त्याला तब्बल २८ चेंडू खेळावे लागले. या तिघांवर मोठी जबाबदारी असणार आहे. याचबरोबरीने सॅमसनला मागील लढतीतील अपयश विसरून मोठी खेळी करावीच लागणार आहे.
गोलंदाजीचा मंदावलेला ‘वेग’
राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरलेला अर्शदीप सिंगला आफ्रिकेमध्ये म्हणावे तसे यश मिळालेले नाही. अर्शदीपने डर्बन लढतीमध्ये २५ धावांच्या मोबदल्यात १ बळी टिपला होता. मात्र त्याला दुसऱ्या लढतीत त्याला ४१ धावा चोपल्या गेल्या. त्याने पहिल्या षटकांत ७, दुसऱ्या षटकांत ६, तिसऱ्या षटकांत १२ तर चौथ्या षटकांत १६ धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याला देखील कामगिरी सुधारावी लागणार आहे. अन्यथा यश दयाळ किंवा विशाख विजयकुमार यांना संधी मिळू शकते. दुसऱ्या लढतीमध्ये फिरकीपटू वरुण चक्रवर्ती व रवी बिष्णोई यांनी चांगली जबाबदारी सांभाळली. त्यांना देखील कामगिरीत सातत्य ठेवावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम, डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन यांना अजूनही त्यांच्या वालयाप्रमाणे खेळाता आले नाही. मात्र, गेराल्ड कोएत्झीच्या छोट्या मात्र महत्वपूर्ण खेळीने दुसऱ्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. आता अनुभवी फलंदाजांना जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.
IND vs SA : हेड-टू-हेड रेकाॅर्ड
खेळले गेलेले सामने : 29,
भारत विजयी : 16,
द. आफ्रिका विजयी : 12,
निकाल नाही : 1
IND vs SA : सामना विनामूल्य कोठे पाहू शकाल….
टीम इंडिया या मालिकेत चार सामने खेळणार आहे. स्पोर्ट्स 18 (Sports 18) आणि कलर्स सिनेप्लेक्स (Colors Cineplex) या टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहता येईल. जर प्रेक्षकांना दुसरा टी-20 सामना मोबाईलवर पाहायचा असेल तर तेही शक्य आहे. यासाठी तुम्हाला जियो सिनेमा (Jio Cinema) ॲप डाउनलोड करावे लागेल. येथे तुम्ही सामना विनामूल्य पाहू शकता.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे :
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाक. आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले सिमेलाब्स, ट्रायबन्स, स्टिलेन्स .