IPL Mga Auction 2025 : आयपीएल मेगा लिलावापूर्वी अनेक संघांनी काही परदेशी खेळाडूंना त्यांच्या संघातून रिलीज(बाहेर) केलं आहे. यामध्ये जोस बटलर आणि ग्लेन मॅक्सवेलसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या खेळाडूंना सोडले म्हणजे आता संघांना नवीन आणि चांगले खेळाडू जोडण्याची संधी मिळणार आहे.
आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंचा खेळ खूप महत्त्वपूर्ण असतो आणि त्यांच्या जाण्याने संघांवरही परिणाम होतो. जाणून घेऊया त्या 7 परदेशी खेळाडूंबद्दल ज्यांना फ्रँचायझी संघांनी सोडले आहे.
1. ट्रेंट बोल्ट : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला राजस्थान रॉयल्सने सोडले आहे. ट्रेंट बोल्ट पॉवरप्लेमध्ये झटपट विकेट घेण्यात पटाईत आहे, ज्यामुळे संघाला चांगला फायदा होतो. आता लिलावात अनेक संघ आपली गोलंदाजी मजबूत करण्यासाठी त्याला संघात घेण्यासाठी प्रयत्न करतील.
2. क्विंटन डी कॉक : दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक सलामीवीर क्विंटन डी कॉक याला लखनौ सुपर जायंट्सने सोडले आहे. डी कॉक त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो सामन्याचेे चित्र बदलण्यात पटाईत आहे. लखनौच्या जागी आता आणखी काही संघ त्याला मजबूत सलामीवीर म्हणून आपल्या संघात समाविष्ट करू शकतात.
3. फिल सॉल्ट : इंग्लंडचा यष्टिरक्षक आणि सलामीवीर फिल सॉल्टला कोलकाता नाईट रायडर्सने सोडले आहे. सॉल्ट जलद धावा करण्यात आणि चांगली सुरुवात करण्यास सक्षम आहे. लिलावात वेगवान सलामीवीर आणि यष्टिरक्षकाच्या शोधात असलेले संघ त्याच्याकडे लक्ष देतील.
4. मिचेल स्टार्क : वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला केकेआरने सोडले आहे. स्टार्कच्या जाण्याने केकेआरच्या गोलंदाजीत बदल होऊ शकतो आणि त्याला लिलावात जास्त मागणी असू शकते.
5.जोस बटलर : इंग्लंडचा शानदार सलामीवीर जोस बटलरलाही राजस्थान रॉयल्सने सोडले आहे. बटलरची स्फोटक फलंदाजी आणि मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता यामुळे तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला. त्याला रिलीज केल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून आता इतर संघ त्याच्यावर लक्ष ठेवणार आहेत.
6. ग्लेन मॅक्सवेल : वेगवान धावा आणि फिरकी गोलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला आरसीबीने रिलीज केलं आहे. मधल्या षटकांमध्ये जलद धावा करणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आता हा बदल आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का असेल.
7. फाफ डु प्लेसिस : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि आरसीबीचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसलासुध्दा रिलीज करण्यात आलं आहे. फॅफचा अनुभव आणि त्याची स्थिरता संघासाठी खूप उपयुक्त ठरली आहे. आता लिलावात तो इतर संघासाठीही महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.