ICC WTC Points Table 2024/25 : न्यूझीलंडविरुद्ध भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने टीम इंडियाचा कसोटी मालिकेत 0-3 असा पराभव केला आहे. या पराभवामुळे भारतीय संघाचं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठं नुकसान झाले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाची एका स्थानानं घसरण झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत आता दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 14 सामने खेळले असून 8 जिंकले आहेत. यासह पाचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.ऑस्ट्रेलियाने 12 सामने खेळले आहेत आणि 8 जिंकले आहेत. त्याला 3 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
न्यूझीलंडने भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना 8 गडी राखून जिंकला. दुसऱ्या सामन्यात 113 धावांनी विजय नोंदवला तर तिसऱ्या सामन्यातही भारताला 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, ऋषभ पंत या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 3 सामन्यात 261 धावा केल्या आहेत.