IPL 2025 Final : जितेशचा जादुई स्कूपने वेधलं लक्ष ; फायनल सामन्यात ठोकला जबरदस्त षटकार! पाहा VIDEO

IPL 2025 Final Jitesh Sharma’s Stunning Scoop Six : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १९० धावा केल्या. आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली, तर या हंगामात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करणारा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा अंतिम सामन्यात १० चेंडूत २४ धावा करू शकला. त्याच वेळी, जितेशने त्याच्या छोट्या खेळीदरम्यान असा शॉट खेळला की पाहून सर्वच चकित झाले.
खाली वाकून जेमीसनला ठोकला जबरदस्त षटकार –
जितेश शर्मा जेव्हा अंतिम सामन्यात फलंदाजीसाठी आला तेव्हा आरसीबीची धावसंख्या ४ विकेट्सवर १३१ धावा होती. मैदानावर उतरल्यानंतर जितेशने जलद धावा काढण्याचा आपला हेतू व्यक्त केला. काइल जेमीसनच्या षटकात जितेशने २ षटकार मारले, ज्यामध्ये तो १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सरळ उभा राहिला जो थोडासा लहान होता आणि शेवटी त्याने खाली वाकून एक स्कूप शॉट खेळला
Unorthodox? ✅
Down the ground? ✅Jitesh Sharma is turning it on in the #Final! 💪
Updates ▶ https://t.co/U5zvVhcvdo#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @jiteshsharma_ pic.twitter.com/9JbC7ktpGX
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
त्यानंतर चेंडू थेट मैदानाच्या बाहेर षटकारासाठी गेला आणि हा शॉट पाहून सर्वच चकित झाले. जितेश शर्माचा हा शॉट पाहिल्यानंतर, त्यावेळी कॉमेंट्री करणारा एबी डिव्हिलियर्स देखील आश्चर्यचकित झाला, ज्यामध्ये त्याने म्हटले की जितेश या शॉटसाठी आधीच तयार होता आणि हे त्याच्या विचारसरणीतही दिसून येत होते.
हेही वाचा – RCB vs PBKS Final : किंग कोहलीचा फायनलमध्ये विक्रमांचा धमाका; पोलार्ड-रोहितला टाकले मागे!
जितेशने आयपीएल २०२५ मध्ये काढल्या २६१ धावा –
आरसीबीकडून आयपीएल २०२५ हंगाम खेळणाऱ्या जितेश शर्मासाठी हा हंगाम खेळाडू म्हणून खूपच यशस्वी ठरला आहे. जितेशला एकूण १५ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने ११ डावांमध्ये फलंदाजी करताना ३७.२९ च्या सरासरीने एकूण २६१ धावा काढल्या. यासह जितेशच्या बॅटमधून एक अर्धशतकी खेळीही पाहायला मिळाली, तर त्याचा स्ट्राइक रेट १७६.३५ असा राहिला. जितेशला बहुतांश सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, ज्याचा त्याने उत्तम फायदा घेतला.





