PBKS vs RCB : सुरुवातीला सलग ६ विजय, मग सलग ६ पराभव! पंजाबच्या नशिबाचा अजब खेळ, प्रिती-श्रेयस अन् निराश पॉन्टिंगचे फोटो व्हायरल
RCB vs PBKS : पंजाबच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर संघाची मालकीण प्रिती झिंटा मैदानात येऊन कर्णधार श्रेयस अय्यरशी चर्चा करताना दिसली.

PBKS vs RCB Royal Challengers Bengaluru Qualifies : आयपीएल २०२६ च्या ६१ व्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा २३ धावांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला मैदानात मिळालेल्या या दणदणीत विजयामुळे आरसीबी चालू हंगामात १८ गुणांसह प्लेऑफमध्ये अधिकृतपणे पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे. १३ सामन्यांमधील आरसीबीचा हा ९ वा विजय आहे. दुसरीकडे, सुरुवातीला सलग ६ सामने जिंकणाऱ्या पंजाब किंग्सला आता सलग सहाव्या पराभवाचा धक्का बसला असून त्यांचे प्लेऑफचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
प्रिती झिंटा चिंतेत, रिकी पॉन्टिंग डगआऊटमध्ये शांत!
पंजाबच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर संघाची मालकीण प्रिती झिंटा मैदानात येऊन कर्णधार श्रेयस अय्यरशी चर्चा करताना दिसली. यावेळी सलग पराभवांमुळे प्रिती झिंटा आणि श्रेयस अय्यर यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे जाणवत होती. दुसरीकडे, पंजाबचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग हे देखील डगआऊटमध्ये अत्यंत शांत आणि गंभीर मुद्रेत एकटेच बसलेले पाहायला मिळाले. संघाच्या या अचानक झालेल्या घसरणीमुळे संपूर्ण पंजाबच्या गोटात शांतता पसरली आहे.
Preity Zinta and shreyas Iyer after the march..!!!#RCBvsPBKS pic.twitter.com/dSbP0AxZSb
— Faruk (@uf2151593) May 17, 2026
आता पंजाबचा मार्ग झाला कठीण –
Heartbroken of Ricky Ponting 💔 pic.twitter.com/hcnYxSr7q0
— Cricket Central (@CricketCentrl) May 17, 2026
पंजाबने आपल्या १३ पैकी सहा सामने गमावले आहेत. या हंगामात पंजाबने सुरुवातील सलग सहा सामने जिंकले होते. मात्र, आता त्यांना सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाबकडे आता १३ सामन्यांमधून १३ गुण आहेत. संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे, परंतु प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग अधिक कठीण झाला आहे.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (आरसीबी) चार गडी गमावून २२२ धावा केल्या. आरसीबीकडून विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर यांनी अर्धशतके झळकावली. कोहलीने तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने ३७ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या, तर व्यंकटेश अय्यरने चार षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने ४० चेंडूंमध्ये नाबाद ७३ धावा केल्या.





