IPL 2025 New Rules : BCCI ने आयपीएल कर्णधारांना दिला मोठा दिलासा, स्लो ओव्हर रेट नियमात केला ‘हा’ बदल

Captains Will Not Be Banned In IPL 2025 Due To Slow Over Rate : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२५ च्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे आता कर्णधारांना स्लो ओव्हर रेटसाठी बंदी घातली जाणार नाही. याव्यतिरिक्त, इम्पॅक्ट प्लेअर नियम २०२७ पर्यंत सुरू राहील. आयपीएलच्या नवीन हंगामाची सुरुवात २२ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्याने होणार आहे.
आता कर्णधारांना मिळणार डिमेरिट पॉइंट्स –
मुंबईत झालेल्या कर्णधार आणि व्यवस्थापकांच्या बैठकीत बीसीसीआयने ही माहिती दिली. क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, बैठकीत सांगण्यात आले की कर्णधारांना स्लो ओव्हर रेटसाठी बंदी घातली जाणार नाही. आयसीसी प्रमाणे डिमेरिट पॉइंट सिस्टम लागू केली जाईल. हे डिमेरिट पॉइंट्स तीन वर्षांसाठी असतील. एका आतल्या सूत्राच्या माहितीनुसार, ‘कर्णधाराला डिमेरिट पॉइंट्स मिळतील, परंतु स्लो ओव्हर रेटसाठी त्याला सामन्यातून वगळले जाणार नाही.’
लेव्हल १ च्या गुन्ह्यांसाठी सामना शुल्काच्या २५ ते ७५ टक्के दंड आकारला जाईल. तुम्हाला डिमेरिट पॉइंट्स देखील मिळतील. जर लेव्हल २ चा गुन्हा गंभीर मानला गेला तर चार डिमेरिट पॉइंट्स दिले जातील. प्रत्येक चार डिमेरिट पॉइंट्ससाठी मॅच रेफरी दंड आकारू शकतात किंवा अतिरिक्त डिमेरिट पॉइंट देऊ शकतात. यामुळे भविष्यातील सामन्यांपासून बंदी देखील येऊ शकते.
हेही वाचा – Yuzvendra Chahal T Shirt : युजवेंद्र चहलने घटस्फोट घेतल्यानंतर धनश्रीला मारला टोमणा? VIDEO होतोय व्हायरल
हार्दिक या हंगामातील पहिला सामना खेळणार नाही –
स्लो ओव्हर रेटमुळे ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांना सामन्यातून वगळण्यात आले. दिल्ली कॅपिटल्सकडून ऋषभ पंत महत्त्वाचा सामना खेळू शकला नाही. हार्दिक पंड्या देखील मुंबई इंडियन्सकडून या हंगामातील पहिला सामना खेळू शकणार नाही. कारण तो मागील हंगामातील शेवटच्या लीग सामन्यासह स्लो ओव्हर रेटमध्ये एकूण तीन वेशा दोषी आढळला होता. त्यामुळे यंदा त्याच्यावर पहिल्या सामन्यात बंदी घातली आहे.
इम्पॅक्ट प्लेअर नियम २०२७ पर्यंत कायम राहणार –
बीसीसीआयने २०२७ पर्यंत इम्पॅक्ट प्लेअर नियम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार, संघ सामन्यादरम्यान एका खेळाडूला बदलू शकतात. काही लोकांनी या नियमावर टीका केली आहे, पण तो सध्या तरी सुरूच राहील. “इम्पॅक्ट प्लेयर्स नियम लागू करत राहतील,” असे एका सूत्राने सांगितले. सामन्यादरम्यान संघ एका खेळाडूला बदलू शकतात. हा नियम किमान २०२७ पर्यंत सुरू राहील. डीआरएस नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता ऑफ स्टंपच्या बाहेरील वाईड बॉलसाठी तसेच उंच वाईड बॉलसाठी डीआरएस घेता येणार. याचा अर्थ असा की पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची व्याप्ती वाढली आहे.





