Axar Patel Fined : दिल्लीच्या विजयानंतर कर्णधार अक्षर पटेलला बीसीसीआयचा दणका! मैदानातील ‘ही’ चूक पडली महागात
Axar Patel Fined : आयपीएल २०२६ मधील ही त्याची पहिलीच चूक असल्याने त्याला किमान दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.

Axar Patel Fined 12 Lakh for Slow Over Rate : आयपीएल २०२६ च्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) पंजाब किंग्सवर (PBKS) शानदार विजय मिळवला असला, तरी या विजयानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सामन्यादरम्यान झालेल्या एका चुकीमुळे अक्षरवर शिस्तभंगाची कारवाई केली असून त्याला मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे.
स्लो ओव्हर रेटचा बसला फटका –
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संघ निर्धारित वेळेत आपली षटके पूर्ण करण्यात अपयशी ठरला. स्लो ओव्हर रेटच्या (Slow Over Rate) या नियमाचा भंग केल्याप्रकरणी अक्षर पटेलला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. आयपीएल २०२६ मधील ही त्याची पहिलीच चूक असल्याने त्याला किमान दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. या कारवाईनंतर अक्षर पटेल आता अशा कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांच्यावर या हंगामात स्लो ओव्हर रेटमुळे आधीच कारवाई झाली आहे. यामध्ये श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.
📉 Delhi Capitals captain Axar Patel has been fined 12 Lakhs for a slow over-rate during the intense clash against PBKS,
[ Axar patel, BCCI, ipl, delhi capitals] pic.twitter.com/lhB6x6X8fW
— SportsTiger (@The_SportsTiger) May 12, 2026
विजयात अक्षरची झंझावाती खेळी –
दंडाची कारवाई झाली असली तरी, दिल्लीला मिळालेल्या या महत्त्वपूर्ण विजयात अक्षर पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली. २११ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना अक्षरने कर्णधाराला साजेसा खेळ करत ५६ धावांची स्फोटक खेळी साकारली. या हंगामातील हे त्याचे पहिलेच अर्धशतक असून याआधीच्या ८ सामन्यांत त्याच्या बॅटीतून एकूण ५० धावादेखील निघाल्या नव्हत्या. त्याच्या या पुनरागमनामुळे दिल्लीच्या प्लेऑफ्सच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दिल्लीचा पंजाबवक रोमहर्षक विजय –
पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २१० धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, दिल्लीने हे लक्ष्य १९ व्या षटकातच ७ गडी राखून पूर्ण केले. एका षटकाआधीच विजय मिळवल्यामुळे दिल्लीचे मनोबल उंचावले आहे. पंजाबच्या सातत्यपूर्ण कामगिरीला खिळ घालत दिल्लीने आता गुणतालिकेत आपली स्थिती सुधारली आहे.





