IPL 2025 : अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाखाली कशी असेल दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या

IPL 2025 Axar Patel as captain of Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२५ साठी नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. आगामी हंगामात अक्षर पटेल दिल्लीचे नेतृत्व करणार आहे. फ्रँचायझीने १४ मार्च रोजी अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. दिल्लीचा पहिला सामना २४ मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होईल. परंतु, आता अक्षर कर्णधार झाल्यानंतर दिल्लीचा प्लेइंग इलेव्हन कशी असू शकतो? यावर चला एक नजर टाकूया.
सलामीची जोडी कोण असणार?
यावेळी दिल्लीसाठी केएल राहुल आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क सलामीवीराची भूमिका बजावू शकतात. दोन्ही खेळाडूंना सलामी फलंदाजीचा बराच अनुभव आहे. राहुल अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये सलामीवीर फलंदाजाची भूमिका बजावत आहे. याशिवाय, गेल्या हंगामात जॅक फ्रेझरने दिल्लीसाठी सलामीवीर फलंदाज म्हणूनही उत्तम भूमिका बजावली होती.
मधल्या आणि खालच्या फळीतील खेळाडू –
Axar Patel
Captain, Delhi Capitals 💙❤️ pic.twitter.com/S2qNuuBO7T— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 14, 2025
मधल्या फळीबद्दल बोलायचे झाले तर, अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्स हे जबाबदारी सांभाळू शकतात. गेल्या हंगामातही दिल्ली कॅपिटल्ससाठी दोन्ही खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. खालच्या फळीत, अक्षर पटेल व्यतिरिक्त, समीर रिझवी जबाबदारी सांभाळू शकतो. याशिवाय, आशुतोष शर्माच्या खांद्यावर फिनिशर फलंदाजाची भूमिका असू शकते. गेल्या हंगामात पंजाब किंग्जसाठी आशुतोषने खालच्या फळीत शानदार कामगिरी केली होती. .त्याच्या घातक फलंदाजीने संघाला अनेक सामने जिंकून दिले होते.
हेही वाचा –IPL 2025 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह सुरुवातीच्या तब्बल ‘इतक्या’ सामन्यांना मुकणार
गोलंदाजी विभागावर एक नजर –
फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव जबाबदारी सांभाळू शकतात. आयपीएल २०२४ मध्ये या फ्रँचायझीसाठी दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. याशिवाय, मिचेल स्टार्क, मुकेश शर्मा आणि टी नटराजन हे वेगवान गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
केएल राहुल, जॅक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, कुलदीप यादव, मिशेल स्टार्क, मुकेश शर्मा, टी नटराजन.





