IPL 2024 (RR vs RCB Match 19) : बंगळुरूसमोर आज राजस्थानचं आव्हान..! जाणून घ्या, हेड-टू-हेड रिकॉर्ड्स…

IPL 2024 (RR vs RCB Match 19) : आयपीएल 2024 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ राजस्थान रॉयल्सचा सामना करण्यासाठी त्यांच्या गडावर पोहोचला आहे. दोन्ही संघांमधील सामना आज (6 एप्रिल,शनिवार ) सवाई मानसिंग स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळवला जाईल. याआधी जाणून घेऊया, आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघापैकी कोणाचे वर्चस्व राहिले आहे.
आयपीएल 2024 मध्ये, राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 3 पैकी तीन सामने जिंकले आहेत, ज्यासह ते 6 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे आरसीबीची कामगिरी निराशाजनक झाली आहे. फाफ डु प्लेसिसच्या संघाने 4 पैकी 3 सामने गमावले आहेत, तर फक्त 1 जिंकला आहे. ते 2 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत.
RR vs RCB Head to Head: दोघांमध्ये कोणाचे वर्चस्व…?
आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ एकूण 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये आरसीबीने 15 वेळा आरआरचा पराभव केला आहे. तर, आरआरने 12 वेळा सामने जिंकले आहेत. दोघांमधील 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.
RR vs RCB: दोन्ही संघांचे संपूर्ण स्क्वाड…
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, क्रुणाल राठौर, आर अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, तनुष कृष्णा, प्रशी कोटियन , आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्जर.
IPL 2025 : पंड्याच्या नेतृत्वावर नाराज; पुढील मोसमात रोहित शर्मा अन्य संघाकडून खेळणार..?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : आकाश दीप, अल्झारी जोसेफ, अनुज रावत, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर, मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोपले, सौरव चौहान, सुयश प्रभुदेसाई, स्वप्नील सिंग, टॉम कुरान, विजयकुमार विशाक, विराट कोहली, विल जॅक, यश दयाल.





