IPL 2024 (PBKS vs RCB Match 58) : पंजाबसमोर आज आरसीबीचे आव्हान, प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोघांनाही विजय आवश्यक…

IPL 2024 (PBKS vs RCB Match 58) : आयपीएल 2024 चा 58 वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आज (गुरुवार,9 मे) संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. हा सामना पंजाबच्या होम ग्राउंड धर्मशाला येथे होणार आहे. याआधी धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात पंजाबला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत पंजाब आता तो पराभव विसरून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे, आरसीबी सुरुवातीचे अपयश विसरून गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचे मागील तीनही सामने जिंकले आहेत. याच कारणामुळे आरसीबी अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. मागील सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. या हंगामात पंजाब आणि बेंगळुरू यांच्यातील ही दुसरी लढत असेल. यापूर्वी झालेल्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव केला होता. विराट कोहलीने 77 धावांची खेळी केली होती.
आयपीएल 2024 पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे. पंजाब किंग्जने 11 सामन्यांत 4 जिंकले आहेत आणि 7 गमावले आहेत. त्याच वेळी आरसीबीने 4 जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत. दोघांना समान 8 गुण आहेत. चांगल्या नेट रन रेटमुळे, RCB 7 व्या स्थानावर आहे आणि पंजाब 8 व्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 32 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 17 पंजाबने आणि 15 आरसीबीने जिंकले आहेत. म्हणजे स्पर्धा एक प्रकारे बरोबरीची आहे.
पंजाब किंवा बेंगळुरू दोघांपैकी एक संघ पोहोचेल प्लेऑफमध्ये….
आरसीबीचे 11 सामन्यात 8 गुण आहेत आणि जर आरसीबीने तिन्ही सामने जिंकले तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढेल. पंजाब किंग्जचीही तीच अवस्था आहे. पंजाबही आठव्या स्थानावर आहे. त्याचे देखील 8 अंक आहेत. मात्र, या दोन संघांपैकी एकालाच 14 गुणांचा टप्पा गाठता येणार आहे.
दरम्यान, विराट कोहली हा आरसीबीच्या फलंदाजीचा मुख्य आधार आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिसही लयीत येताना दिसत आहे. विल जॅकनेही गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावून आशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मधल्या फळीतील रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांनीही गेल्या काही सामन्यांमध्ये महत्त्वाच्या प्रसंगी चांगली खेळी केली आहे. मात्र, आरसीबीची गोलंदाजी अजूनही कमकुवत आहे. मोहम्मद सिराज आता लयीत येताना दिसत आहे. यश दयाल आणि विजय कुमार यांनीही गुजरात टायटन्सविरुद्ध चांगली गोलंदाजी केली आहे.





