PBKS vs RCB : ‘यह तो पानी पिलाता है…’, विराटकडून युवा पदार्पणवीर मुशीर खानला स्लेजिंग, VIDEO व्हायरल

PBKS vs RCB Virat Kohli’s alleged sledging of Musheer Khan : आरसीबी आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली मैदानावर खूप आक्रमक असतो आणि इतर खेळाडूंना खूप स्लेजिंग करतो. याची झलक आपल्याला मुल्लानपूर येथे झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यातही मिळाली. त्याने युवा भारतीय फलंदाज आणि आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या सरफराज खानचा भाऊ मुशीर खानला स्लेजिंग केले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुशीर खान इम्पॅक्ट सब म्हणून फलंदाजीला आला. जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा क्षेत्ररक्षण करणारा विराट कोहली त्याच्या सहकाऱ्याला म्हणू लागला, ‘यह तो पानी पिलाता है।’, परंतु त्याच्या असे म्हणण्याचा आवाज व्हिडिओमध्ये ऐकू येत नाही. पण, असा दावा केला जात आहे. त्याच वेळी, काही लोक असा दावा करत आहेत की विराट म्हणत होता की ‘मुशीर अभी तो पानी पिलाने आए थे और अब बैटिंग कर रहे हैं।’ या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“Pani Pilata Hai…” Virat Kohli making fun of 20 year old #PunjabKings player #Musheerkhan
This looks really saddening when a 20 year old is on the field batting against #RCB and being a legend for many; you make fun of him by saying “ye pani pilata h “. #shamelessViratKohli pic.twitter.com/xJe5gwQsM9— Swastika Sruti (@SrutiSwastika) May 29, 2025
विराटकडून मुशीरला मिळाली होती बॅट भेट –
‼️Kohli saying “Ye to Pani pilata hai” to young Musheer Khan.
Itna lamba toh usne bola bhi nahi
Ki pani pilaya tha batting karne aa gaya‼️ pic.twitter.com/msvbxwn4tT— Was Guri (@Was_Guri) May 29, 2025
आयपीएल २०२५ मधील लीग टप्प्यातील आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहलीने त्याची बॅट मुशीर खानला भेट दिली होती. त्यावेळी पंजाब किंग्जनेही त्यांच्या अधिकृत पेजवर व्हिडिओ शेअर केला. त्यात मुशीर खान खूप आनंदी दिसत होता आणि तो त्याच्या पंजाब किंग्जच्या सहकाऱ्यांना विराट कोहलीची बॅट दाखवत होता. त्यामध्ये मुशीर खान विराट कोहलीला ‘भैया’ म्हणत असल्याचे ऐकू येत होते. मुशीर खान त्याच्या आयपीएल पदार्पणात ३ चेंडू खेळल्यानंतर शून्य धावांवर बाद झाला.
हेही वाचा – PBKS vs RCB : जितेश शर्माने ‘सुपरमॅन’प्रमाणे हवेत झेपावत घेतला अद्भुत कॅच, VIDEO होतोय व्हायरल
आरसीबी ९ वर्षांनी फायनलमध्ये –
सामन्याबद्दल बोलायचे, तर आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जाच ८ विकेट्सनी दारुण पराभव करत चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात आरसीबीने प्रथम धारदार गोलंदाजीच्या जोरावर १०१ धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात फिल सॉल्टच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १० षटकांत विजयावर शिक्कामोर्तब करत ९ वर्षांनी फायनलमध्ये प्रवेश केला.





