IPL 2024 (RR vs PBKS Match 65) : राजस्थानचे फलंदाज फेल, पंजाबसमोर ठेवलं 145 धावांचे माफक लक्ष्य…

IPL 2024 (RR vs PBKS Match 65 Score Update) : आज प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या पंजाब किंग्जशी होत आहे. आयपीएल मधील हा 65 वा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थान संघाने मागील तीन सामने गमावले असून त्यांचे प्रयत्न विजयी मार्गावर परतणे आणि गुणतालिकेत अव्वल दोन स्थान निश्चित करण्यावर केंद्रित असतील. दुसरीकडे, पंजाबलाही पराभवाचा सिलसिला संपवायचा आहे.
आयपीएल 2024 च्या 65 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 9 बाद केवळ 144 धावा करता आल्या. आरआरकडून रियान परागने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 34 चेंडूत 48 धावांची शानदार खेळी केली. जोस बटलर या सामन्यात खेळत नव्हता, जो पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानात परतला आहे. त्याची जागा इंग्लिश क्रिकेटर टॉम कोहलर कॅडमोरने घेतली, पण त्याला 23 चेंडूत केवळ 18 धावा करता आल्या. या डावात रविचंद्रन अश्विननेही काही विचित्र शॉट्स मारले, ज्याने 28 धावांचे योगदान दिले. या फलंदाजाशिवाय इतर फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाही त्यामुळे कोणतीही मोठी भागीदारी न झाल्यामुळे राजस्थानला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा राजस्थान रॉयल्सचा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. यशस्वी जैस्वाल केवळ 4 धावा करून बाद झाला आणि या सुरुवातीच्या धक्क्याने आरआरचा धावगती कमी झाली होती. पॉवरप्लेच्या 6 षटकांत राजस्थानला केवळ 1 बाद 38 धावा करता आल्या. पॉवरप्ले संपल्यानंतर लगेचच 2 विकेट पडल्या, त्यामुळे संघाने 42 धावांत 3 विकेट गमावल्या. 11व्या षटकापर्यंत संघाचा धावगती 6 च्या आसपास होती. 12व्या षटकात राहुल चहरने 17 धावा दिल्या तरीही धावगती पूर्णपणे मंदावली होती.
15 षटकांत आरआरने 103 धावा केल्या होत्या आणि 6 विकेट गमावल्या होत्या. दरम्यान, रविचंद्रन अश्विनने 19 चेंडूत 28 धावांची खेळी खेळली, त्याने रियान परागसोबत 50 धावांची भागीदारी केली. पुढच्या 3 षटकात 27 धावा आल्या, त्यामुळे RR ने 18 षटकात 130 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर राजस्थान 150 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते, पण शेवटची 2 षटके पंजाबसाठी चांगलीच गेली. शेवटच्या 2 षटकात केवळ 14 धावा झाल्या, त्यामुळे राजस्थानला 9 विकेट गमावून केवळ 144 धावा करता आल्या.
पंजाब किंग्जकडून सॅम कुरन, हर्षल पटेल आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हर्षल पटेलला आता पर्पल कॅप मिळाली आहे. त्याच्या 12 सामन्यात 20 विकेट झाल्या आहेत. नाथन एलिस आणि अर्शदीप सिंहला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
रियानच्या 500 धावा पूर्ण…
रियान पराग आयपीएल 2024 मध्ये 500 धावांचा टप्पा गाठणारा सहावा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली, रुतुराज गायकवाड, ट्रॅव्हिस हेड, साई सुदर्शन यांनी ही कामगिरी केली आहे. याच सामन्यात रियान परागच्या आधी संजू सॅमसनने 500 धावा पूर्ण केल्या होत्या. परागने आयपीएलच्या एकाच मोसमात 500 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मोसमात त्याने 4 अर्धशतकांच्या खेळी खेळल्या आहेत.
PAK vs IRE 3rd T20I : बाबर आझमने रचला इतिहास, विराट कोहलीला मागे टाकून केला विश्वविक्रम…
राजस्थानची दुसरी निच्चांकी धावसंख्या….
आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सने फलंदाजीत जबरदस्त ताकद दाखवली आहे. सीझनच्या सुरुवातीला खेळताना, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात राजस्थानची आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या होती. सीएसकेविरुद्ध आरआरला केवळ 141 धावा करता आल्या. आता पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचे फलंदाज केवळ 144 धावाच करू शकले. या मोसमात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.





