RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

RR vs PBKS Vaibhav Suryavanshi and Arshdeep Singh : वैभव सूर्यवंशी नुकताच एक महिन्यापूर्वी १४ वर्षांचा झाला आहे. खरं तर, तो अजूनही लहान मुलगाच आहे. पण जेव्हा तो बॅट हातात घेऊन मैदानात उतरतो, तेव्हा त्याला लहान समजण्याची चूक कोणीही करू नये. आयपीएल २०२५ मध्ये त्याने अवघ्या काही सामन्यांत याचे अनेक पुरावे दिले आहेत. पण असं वाटतंय की, स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला हे विसरला होता आणि त्याने वैभवशी पंगा घेण्याची चूक केली. पंजाब किंग्जच्या या वेगवान गोलंदाजाला वैभवने असं काही प्रत्युत्तर दिले की, तो कदाचित कधीच विसरणार नाही.
रविवार १८ मे रोजी जयपूर येथे आयपीएल २०२५ च्या ५९ व्या सामन्यात राजस्थान आणि पंजाब आमनेसामने होते. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २१९ धावांचा मोठा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरादाखल, राजस्थानच्या यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी येताच बॅट फिरवण्यास सुरुवात केली आणि चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. जैस्वाल धोकादायक दिसत होता पण वैभवने अनुभवी गोलंदाजांनाही चांगलेच झोडपले.
VAIBHAV SURYAVANSHI – Indian cricket future is here. 🇮🇳#RRvsPBKS #PBKSvsRR#vaibhavsooryavanshi #VaibhavSuryavanshi
pic.twitter.com/f8ngjpMvWX— Kavya Maran (@Kavya_Maran_SRH) May 18, 2025
अर्शदीप सिंगने वैभवला डिवचलं –
यादरम्यान, तिसऱ्या षटकात एक अद्भुत दृश्य दिसले. पहिल्याच षटकात जैस्वालने वाईटरित्या धुलाई केलेला अर्शदीप सिंग हे षटक टाकत होता. वैभवने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. पुढच्या तीन चेंडूंवर एकही धाव आली नाही पण या वेळी अर्शदीपने युवा वैभवशी पंगा घेतला. वैभवने षटकातील चौथा चेंडू गोलंदाजाकडे परतवला आणि अर्शदीपने चेंडू पकडला. यानंतर त्याने रागाने चेंडू वैभवच्या दिशेने फेकला आणि त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान
वैभवशी पंगा घेणे अर्शदीपला पडलं महागात –
🚨 Indian Premier League 2025, PBKS vs RR 🚨
Arshdeep Singh bowled 4 overs, conceding 60 runs without taking a wicket.#RRvsPBKS #RRvPBKS #PBKSvsRR #PBKSvRR #IPL2025 #TATAIPL2025 #TATAIPL #Jaipur #RajasthanRoyals #HallaBol #PunjabKings #SherSquad #ArshdeepSingh pic.twitter.com/yZtwMfRWqs
— Sporcaster (@Sporcaster) May 18, 2025
हा चेंडू वैभवला लागला नाही. मात्र, त्याने अर्शदीपला धडा शिकवण्याचा दृढनिश्चयी केला. वैभवने षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारून अर्शदीपला चोख प्रत्युत्तर दिले. अर्शदीपच्या या षटकातून १६ धावा आल्या. अशाप्रकारे, त्याने त्याच्या पहिल्या २ षटकांत ३८ धावा दिल्या. वैभवच्या आधी, यशस्वीने डावाच्या पहिल्याच षटकात अर्शदीपला ४ चौकार आणि १ षटकार मारला होता. एवढेच नाही तर वैभव आणि यशस्वी यांनी पॉवरप्लेमध्ये पंजाबच्या गोलंदाजांना इतकी धुलाई केली की संघाने फक्त १७ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. या हंगामात कोणत्याही संघाने केलेले हे सर्वात जलद अर्धशतक होते.
हेही वाचा – RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक
यशस्वी वैभवची तुफान फटकेबाजी –
त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे डावाच्या पहिल्या २५ चेंडूंमध्ये यशस्वी आणि वैभवने फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने सर्व धावा काढल्या. दोघांनीही या डावातील २६ व्या चेंडूवर पहिली सिंगल धाव घेतली. वैभवने फक्त १४ चेंडूत ४० धावा (४ चौकार, ४ षटकार) केल्या, तर यशस्वीने २५ चेंडूत ५० धावा (९ चौकार, १ षटकार) केल्या. मात्र, तरीही राजस्थानला हा सामना १० धावांनी गमवावा लागला.





