Shreyas Iyer : परदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीवर श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने जिंकली सर्वांची मनं, पाहा VIDEO

Shreyas Iyer’s Bold Statement on IPL 2025 Goes Viral :भारत-पाक तणावानंतर ८ दिवसांच्या विश्रांतीनंतर आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. आता बहुतेक परदेशी खेळाडू मायदेशी परतलेत आणि आता जेव्हा आयपीएल पुन्हा सुरू होत आहे. तेव्हा त्यापैकी बरेच जण राष्ट्रीय कर्तव्य किंवा वैयक्तिक कारणांमुळे माघारी परतत नाहीत. अशा परिस्थितीत आयपीएल संघांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. पण आता पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने याबाबत एक वक्तव्य करुन सर्वांची मनं जिंकली आहेत.
पीबीकेएसने शेअर केलेला व्हिडीओ होतोय व्हायरल –
खरं तर, पीबीकेएसने एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये पंजाब संघाचे दोन इंफ्लुएंसर परदेशी खेळाडूंबाबत असलेल्या अनिश्चिततेबद्दल बोलताना दिसत आहेत. त्यापैकी एक व्यक्ती म्हणतो की, ‘मार्कस स्टॉइनिस अजून आला नाहीये’, तर दुसरा म्हणाला की, ‘मिशेल ओवेन आला आहे’. यानंतर पहिला व्यक्ती म्हणतो की, ‘जोश इंगलिसबद्दल काय, तोही फॉर्ममध्ये आला होता’. यावर दुसरा व्यक्ती म्हणाला की, ‘काइल जेमीसन कोणाची जागा घेणार आहे? मार्को जॅन्सन येत आहे का?’
श्रेयस अय्यरने जिंकली सर्वांची मनं –
Yatra pratibha avsara prapnotihi! ❤️ pic.twitter.com/UBRjCs8Bua
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 17, 2025
यावर दुसरी व्यक्ती म्हणतो की, ‘तो येत आहे, पण २६ तारखेला सर्व दक्षिण आफ्रिकन खेळाडू निघून जातील.’ यानंतर, श्रेयस अय्यर या चर्चेत सहभागी होतो आणि त्या दोघांना म्हणतो की, ‘हो, तुम्ही घेतलेली सर्व नावे मला माहित आहेत. ते सर्व खेळाडू प्रतिभावान आहेत. पण भाई, एक गोष्ट लक्षात ठेवा की ही इंडियन प्रीमियर लीग आहे.’ श्रेयस अय्यरच्या या वाक्यातून स्पष्ट होते की ही लीग परदेशी खेळाडूंवर अवलंबून राहणार नाही. यानंतर ते दोन व्यक्ती शांत होतात. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Virat Kohli : ‘विराट कोहलीकडे सर्व काही आहे, फक्त…’, सुरेश रैनाच्या वक्तव्याने वेधलं सर्वांच लक्ष
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना ११ जूनपासून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यामुळे, या दोन्ही देशांचे खेळाडू एकतर आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होणार नाहीत किंवा प्लेऑफपूर्वी इंग्लंडला जातील. दुसरीकडे, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्येही एकदिवसीय मालिका आहे. यामुळे, या देशांचे खेळाडू देखील येऊ शकत नाहीत असे दिसते, परंतु श्रेयस अय्यरने सर्वांना एक कडक संदेश दिला आहे.





