RR vs PBKS : कर्णधार असावा तर असा! दुखापतीनंतरही श्रेयसने पंजाबसाठी साकारली महत्त्वपूर्ण भागीदारी

Shreyas Iyer’s Gritty Performance in IPL 2025 RR vs PBKS Match : आयपीएल २०२५ च्या ५९ व्या सामन्यात पंजाब किंग्ज राजस्थान रॉयल्सशी भिडले. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने त्याच्या लढाऊ वृत्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. खरंतर, या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरला दुखापतीचा सामना करावा लागला होता. पण प्लेऑफच्या शर्यतीचा विचार करता, हा सामना पंजाबसाठी खूप महत्त्वाचा होता. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरने दुखापतीची चिंता न करता सामना खेळण्याचा निर्णय घेतला आणि संघासाठी महत्त्वाच्या धावाही केल्या.
दुखापत असूनही अय्यर खेळायला उतरला-
सामन्याच्या एक दिवस आधी सराव सत्रादरम्यान अय्यरच्या तर्जनीला खोल दुखापत झाली होती. असे असूनही, त्याने राजस्थान संघाविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो टॉससाठी मैदानात आला तेव्हा त्याच्या बोटाला जाड पट्ट्या बांधलेल्या होत्या. दुखापतीची तीव्रता पाहता, अनेकांना अशी अपेक्षा होती की अय्यर या महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजी करणार नाही, परंतु कर्णधाराने केवळ मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला नाही तर आपल्या फलंदाजीने संघाच्या धावसंख्येतही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
श्रेयस अय्यरने जिंकली मनं –
Ricky Ponting is guiding Shashank Singh from outside ground to set up the field and bowling spell. Shreyas Iyer is injured and on rest. #PBKS #PBKSvsRR #RickyPonting #ShashankSingh #ShreyasIyer pic.twitter.com/DWFMeYIiBQ
— Shankar Singh (@Shanky_Parihar) May 18, 2025
या सामन्यात श्रेयस अय्यरने २५ चेंडूत ३० धावांची खेळी केली, ज्यामध्ये ५ चौकारांचा समावेश होता. उष्णतेमुळे आणि दुखापतींच्या दबावामुळे, त्याने काही शानदार फटके खेळले, ज्यामुळे पंजाब किंग्जला सुरुवातीच्या पराभवातून सावरण्यास मदत झाली. तो फलंदाजीसाठी आला तेव्हा पंजाब संघाने ३४ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर त्याने नेहल वधेरासोबत एक महत्त्वाची भागीदारीही केली. ज्यामुळे पंजाब संघ २०० हून अधिक धावा करण्यात यशस्वी झाला.
हेही वाचा – IPL 2025 Playoff : आजचे सामने स्पष्ट करणार प्लेऑफचे चित्र, मुंबई-दिल्लीचं वाढलं टेन्शन! कसा आहे समीकरण?
पंजाब किंग्जने उभारला २१९ धावांचा डोंगर –
Shreyas Iyer, nursing a finger injury from training, came out to bat but has since left the field. 🤕
Harpreet Brar replaces him, while Shashank Singh takes over as captain! ✔️#IPL2025 #ShreyasIyer #RRvPBKS pic.twitter.com/fhqh1jrV0g
— Dinesh Verma (@DineshVerm1047) May 18, 2025
या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. पंजाबने २० षटकांत ५ गडी गमावून २१९ धावा केल्या. या डावात नेहल वधेराने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३७ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७० धावा केल्या. त्याच वेळी, शशांक सिंगने ३० चेंडूत ५९ धावा काढत नाबाद राहिला. प्रभसिमरन सिंग आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनी २१-२१ धावांचे योगदान दिले.





