Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलचा मोठा धमाका! वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी करत सूर्याला टाकलं मागं

मॅक्सवेलने वॉर्नरच्या विक्रमाशी केली बरोबरी –
ग्लेन मॅक्सवेलने आपल्या दमदार फलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही शानदार कामगिरी केली. त्याने सामन्यादरम्यान एक अप्रतिम झेल घेतला. हा खास झेल दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसचा होता, जो त्यावेळी आक्रमक फलंदाजी करत होता. ब्रेव्हिसने अवघ्या 22 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले होते आणि तो संघासाठी धोकादायक ठरत होता. यासह मॅक्सवेलने डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी केली. मॅक्सवेलने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सीमारेषेजवळ (आउटफिल्ड) 62 झेल घेतले, जो ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये सर्वाधिक झेलचा विक्रम आहे.
Forget about the IPL, Glenn Maxwell is a beast when it comes to playing T20s for Australia. 🔥🔥
Under pressure, he is on another level 🫡
King Size Maxi 👑🚨#GlennMaxwell #AUSvSA pic.twitter.com/3QVzSaA6Xn— Rebel_Warriors (@Rebel_Warriors) August 16, 2025
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आउटफिल्ड झेल:
- 62 ग्लेन मॅक्सवेल / डेव्हिड वॉर्नर
- 50 ॲरॉन फिंच
- 41 स्टीव्ह स्मिथ
हेही वाचा – Suryakumar Yadav : आशिया कपपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! धडाकेबाज खेळाडू फिटनेस टेस्ट झाला पास
ग्लेन मॅक्सवेलने सूर्यालाही टाकले मागे –
Runs, breakthroughs, and magic in the field.
Glenn Maxwell, truly Australia’s X-factor!
PC: Jio hotstar#GlennMaxwell #AUSvsSA #T20ICricket #CricTracker pic.twitter.com/C37RYC0kLi
— CricTracker (@Cricketracker) August 16, 2025
ग्लेन मॅक्सवेलचे योगदान केवळ क्षेत्ररक्षणापुरते मर्यादित राहिले नाही. त्याने फलंदाजीनेही संकटात सापडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सावरण्याचे काम केले. 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 122/6 अशा बिकट परिस्थितीत होता. तेव्हा मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक नाबाद 62 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला.
या खेळीदरम्यान मॅक्सवेलने दोन षटकार ठोकले आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला मागे टाकले. मॅक्सवेलच्या नावावर आता 148 षटकार आहेत, जे सूर्यकुमारच्या 146 षटकारांपेक्षा दोन जास्त आहेत. या यादीत तो रोहित शर्मा (205), मार्टिन गप्टिल (173), मोहम्मद वसीम (168), जोस बटलर (160) आणि निकोलस पूरन (149) यांच्यानंतर सहाव्या स्थानावर आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
- रोहित शर्मा (भारत) – 205
- मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड) – 173
- मोहम्मद वसीम (युएई) – 168
- जोस बटलर (इंग्लंड) – 160
- निकोलस पूरन (वेस्ट इंडीज) – 149
- ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) – 148
- सूर्यकुमार यादव (भारत) – 146





