IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : कोण आहे CSK चा समीर रिझवी? ज्यानं षटकार लगावत केली आयपीएल कारकिर्दीची सुरुवात….

Who Is CSK Sameer Rizvi : आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात समीर रिझवीला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले. अनकॅप्ड खेळाडू म्हणून समीर यंदा सर्वात महागडा खेळाडू ठरला. समीरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, मात्र त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. यानंतर एमए चिदंबरम स्टेडियमवर गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात समीरने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली इनिंग खेळली आणि षटकार लगावून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली.
समीर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता आणि त्यावेळी राशिद खान गोलंदाजी करत होता. समीरने आपल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर राशिद खानला जोरदार षटकार ठोकला. यानंतर त्याने आणखी एक षटकार मारला. त्याने 6 चेंडूत 2 षटकार मारत 14 धावांची खेळी खेळली. चला तर मग जाणून घेऊया की, षटकाराने आयपीएल करिअरची सुरुवात करणारा समीर रिझवी कोण आहे आणि चेन्नईने त्याच्यावर एवढी मोठी रक्कम का खर्च केली?
समीर हा उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवासी आहे. त्यांचा जन्म 06 डिसेंबर 2003 रोजी झाला. सध्या त्यांचे वय अवघे २० वर्षे आहे. समीर उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. नुकत्याच पार पडलेल्या देशांतर्गत हंगामात समीरने चांगली कामगिरी केली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे आणि रणजी ट्रॉफीमध्ये त्याने धावा केल्या होत्या. विजय हजारे ट्राफीमध्ये समीरची बॅट चांगलीच चालली होती. समीर त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याने आयपीएलच्या पहिल्या डावात ते दाखवून दिले. दरम्यान, समीर रिझवी याने आयपीएलपूर्वी झालेल्या सराव सामन्यात 20 चेंडूंत 55 धावांची खेळी करून संघव्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेतले होते.
देशांतर्गत हंगामापूर्वी खेळल्या गेलेल्या UP T20 लीगमध्ये समीरने कानपूर स्ट्रायकर्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता. त्याने 10 सामन्यांमध्ये 50.56 च्या सरासरीने आणि 188.8 च्या स्ट्राइक रेटने 455 धावा केल्या. या कालावधीत, त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 122 धावा होती. तसेच यूपी टी-20 लीगमध्ये एकूण 55 षटकार ठोकले होते. तसेच या लीगमध्ये त्याने केवळ 47 चेंडूंत शतक ठोकले होते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-cskvsgt-match-7chennai-super-kings-beat-gujarat-titans-by-63-runs/
आतापर्यंतचे करिअर…
उल्लेखनीय म्हणजे, समीरने आतापर्यंत 7 प्रथम श्रेणी, 11 लिस्ट ए आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. 10 प्रथम श्रेणी डावात फलंदाजी करताना त्याने 96 धावा केल्या आहेत. याशिवाय समीरने लिस्ट ए च्या 9 डावांमध्ये 29.28 च्या सरासरीने 205 धावा केल्या, ज्यामध्ये उच्च स्कोअर 61* धावा होता. T20 च्या 10 डावात फलंदाजी करताना त्याने 44.14 च्या सरासरीने आणि 137.33 च्या स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या आहेत, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.






