Concussion Substitute Controversy : नियमांचा की दुखापतीचा खेळ? मिचेल सँटनरच्या ‘त्या’ दुखापतीने पेटला वाद; जयवर्धने यांनी दिलं ‘हे’ उत्तर
Concussion Substitute Controversy : १०३ धावांच्या मोठ्या पराभवानंतर आता मुंबई इंडियन्सने घेतलेल्या 'कन्कशन सब्स्टीट्यूट'च्या निर्णयावर क्रिकेट वर्तुळातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Mumbai Indians Concussion Substitute Controversy : आयपीएल २०२६ (IPL2026) च्या हंगामातील मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामना केवळ निकालासाठीच नाही, तर एका वादासाठीही लक्षात राहणारा ठरला आहे. १०३ धावांच्या मोठ्या पराभवानंतर आता मुंबई इंडियन्सने घेतलेल्या ‘कन्कशन सब्स्टीट्यूट’च्या निर्णयावर क्रिकेट वर्तुळातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा धुव्वा उडवला, मात्र सामन्यानंतर खरा वाद ‘कन्कशन सब्स्टीट्यूट’ (Concussion Substitute) वरून रंगला आहे. मुंबई इंडियन्सने दुखापतग्रस्त मिचेल सँटनरच्या जागी शार्दुल ठाकूरला मैदानात उतरवले. मात्र, सँटनरला झालेली दुखापत खांद्याची की डोक्याची, यावरून सोशल मीडियावर संभ्रमाचे वातावरण आहे. (Concussion Substitute Controversy)
Mumbai Indians head coach Mahela Jayawardene offered an explanation on the concussion sub controversy with Mitchell Santner being replaced by Shardul Thakur during the MI innings.#IPL2026 #MIvCSK #MI pic.twitter.com/ep3G9E8Hcr
— Circle of Cricket (@circleofcricket) April 24, 2026
नेमकं प्रकरण काय?
VIKRANT GUPTA COOKED MUMBAI INDIANS 🥶
“If Santner had a shoulder injury, how was a concussion substitute approved? Those are only valid for head or neck injuries, and that needs clear evidence.” 😭pic.twitter.com/Vdiw9vdsZx
— Cricket Central (@CricketCentrl) April 24, 2026
सामन्याच्या १७ व्या षटकात सँटनरने झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जोरात जमिनीवर आदळला. सुरुवातीला त्याला खांद्याला दुखापत झाल्याचे दिसले आणि नंतर त्याच्या खांद्यावर पट्टीही बांधलेली होती. असे असूनही मुंबई इंडियन्सने त्याला डोक्याला दुखापत झाल्याचे सांगत कन्कशन सब्स्टीट्यूटची मागणी केली. आयपीएलच्या नियमांनुसार, केवळ डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत (Concussion) झाल्यासच असा बदल करता येतो. त्यामुळे जर दुखापत खांद्याची होती, तर शार्दुलला संधी कशी मिळाली? असा सवाल आता चाहते विचारत आहेत. Concussion Substitute Controversy
मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकांचे वादावर स्पष्टीकरण – (Concussion Substitute Controversy)
🚨 Scam no one noticed in #MIvsCSK #IPL2026 match yesterday by @mipaltan. If MI won, this would have been a bigger controversy 💯
MI replaced Shoulder Injured Mitchell Santner with Shardul Thakur as a concussion substitute.
As per rules, concussion sub is allowed only if a… pic.twitter.com/wHdmXjN7BJ
— Fanbhai 💛 (@cskbarcelona) April 24, 2026
मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धने ( Mahila Jaivardhan ) यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, “सँटनर जमिनीवर पडताना त्याचे डोके आधी आदळले, ज्यामुळे त्याला चक्कर येत होती. वैद्यकीय चाचणीनंतरच आम्ही अंपायर आणि मॅच रेफरींकडे बदल करण्याची परवानगी मागितली आणि त्यांनी ती दिली.” दरम्यान, मुंबईसाठी हा हंगाम अत्यंत कठीण जात असून ७ सामन्यांत त्यांच्या खात्यात केवळ ४ गुण आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर संघ अपयशी ठरत असल्याची कबुलीही जयवर्धने यांनी दिली आहे.





