Lucknow Super Giants & Manimaran Siddharth : आयपीएल 2024 च्या 21 व्या सामन्यात रविवारी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना झाला. LSG ने लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर 5 बाद 163 अशी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात गुजरातचा संघाला 18.5 षटकांत सर्व बाद 130 धावांच करता आल्या आणि लखनौने हा 33 धावांनी जिंकला. या सामन्यात लखनौसाठी, फिरकीपटू मणिमारन सिद्धार्थ हा (Impact Player) प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. यादरम्यान त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 29 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.
आयपीएल 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनौसाठी प्रभावशाली खेळाडू (Impact Player) म्हणून आलेला मणिमारन सिद्धार्थ डोकेदुखी ठरला. त्याने चार षटके टाकली आणि 29 धावा दिल्या. या काळात त्याला एकही विकेट मिळाली नाही.
वास्तविक, पॉवरप्लेच्या पहिल्या दोन षटकांमध्ये त्याने किफायतशीर गोलंदाजी केली पण तिसऱ्या षटकात लखनौसाठी तो महागात पडला. त्याने डावाच्या पाचव्या षटकात 12 धावा तर दिल्या शिवाय एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. या षटकात त्याने तीन नो-बॉल टाकले. आयपीएलमध्ये सर्वाधिक नो-बॉल टाकणारा तो फिरकी गोलंदाज ठरला. या प्रकरणात सिद्धार्थने अमित मिश्रा, अनिल कुंबळे आणि योगेश नागर यांना मागे टाकले. ज्यांनी प्रत्येकी दोन नो बॉल टाकले होते.
IPL मध्ये एका षटकात सर्वाधिक नो बॉल टाकणारे गोलंदाज
IPL 2024 : मणिमरण सिद्धार्थ (3 नो-बाॅल)
IPL 2009 : अमित मिश्रा (2 नो-बाॅल)
IPL 2010 : अनिल कुंबळे (2 नो-बाॅल)
IPL 2011 : योगेश नगर (2 नो-बाॅल)
IPL 2016 : अमित मिश्रा 2016 (2 नो-बाॅल)