IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्स संघात मोठा फेरबदल, मिचेल मार्शच्या जागी ‘या’ स्टार खेळाडूची झाली एंट्री…

IPL 2024 & Delhi Capitals : आयपीएल 2024 च्या 40 व्या सामन्यात बुधवारी दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा 4 धावांनी पराभव केला. सामन्याच्या एका दिवसानंतर संघात मोठे फेरबदल पाहायला मिळाले. संघात मॅच विनर खेळाडूचा प्रवेश झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने (DC) गुरुवारी दुखापतग्रस्त खेळाडू मिचेल मार्शच्या ( Mitchell Marsh ) बदली खेळाडूची घोषणा केली. मार्शच्या जागी अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू गुलबदिन नायबला ( Gulbadin Naib ) संघात स्थान मिळाले आहे. मार्श दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
दिल्लीनं 50 लाखात केलं करारबध्द…
गुलबदिन नायब प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. दिल्लीने त्याला 50 लाखांच्या मूळ किमतीत साइन केले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 82 एकदिवसीय आणि 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या 71 डावांमध्ये त्याने 19.85 च्या सरासरीने आणि 74.87 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 231 धावा केल्या आहेत.
The Afghan powerhouse is now a part of DC 💙💪🏼
Here’s welcoming @GbNaib who joins DC as a replacement for Mitch Marsh, who has been ruled out of #IPL2024. pic.twitter.com/1CwbCnuWKz
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 25, 2024
या काळात त्याने 5 अर्धशतकेही झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 73 विकेट्स आहेत. याशिवाय त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 54 डावांमध्ये 807 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 124.92 होता. गुलबदिन नायबनेही या फॉरमॅटमध्ये 26 बळी देखील घेतले आहेत.
दुखापतीमुळे मार्श परतला ऑस्ट्रेलियात…
याआधी, मिचेल मार्श हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या 17 व्या हंगामातून बाहेर पडला होता. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवर उपचारासाठी तो ऑस्ट्रेलियाला परतला आहे. या मोसमात त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 20 धावा, राजस्थान रॉयल्सविरुद्ध 23 धावा आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 18 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याचे खातेही उघडले नाही. त्याला या मोसमात गोलंदाजीतही यश मिळाले नाही.





