IPL 2023 Auction – बिहारमध्ये जन्मलेला वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यंदाच्या आयपीएल लिलावात करोडपती झाला आहे. शुक्रवारी कोची येथे सुरु असलेल्या आयपीएल 2023च्या मिनी लिलावात मुकेशला दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले. या लिलावासाठी मुकेशची मूळ किंमत ही फक्त 20 लाख रुपये होती. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तीनदा प्रयत्न करूनही अपयशी ठरलेला मुकेश आयपीएलमुळे करोडपती बनलाय. महत्वाचं म्हणजे, मुकेशचे वडील हे रिक्षा चालवतात.
आयपीएलच्या इतिहासात प्रत्येक हंगामातील महागडे खेळाडू; २००८ पासून २०२३ पर्यंत ‘या’ नावांचा समावेश
मुकेश बिहारमधील गोपालगंजचा राहणारा असून गरिबीमुळे त्याचे वडील कोलकाता जाऊन रिक्षा चालवू लागले. मुकेशने लहानपानापासून गोपालगंजमध्ये क्रिकेट खेळले आहे. यादरम्यान त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर बिहारच्या अंडर-19 संघात स्थान मिळवले. त्यानंतरच्या काळात मुकेशच्या वडिलांनी त्याला नोकरी करण्यासाठी कोलकाता येथे बोलावून घेतले. मात्र, मुकेशने क्रिकेट खेळणे सोडले नाही आणि कोलकात्यातही तो क्रिकेट खेळत राहिला.
आयपीएलच्या इतिहासात प्रत्येक हंगामातील महागडे खेळाडू; २००८ पासून २०२३ पर्यंत ‘या’ नावांचा समावेश
मुकेशने कोलकात्यामध्ये खासगी क्लबसाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यादरम्यान तो एक सामना खेळून 500 रुपये कमवत असे. त्यानंतर 2014 मध्ये त्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या चाचण्यांमध्ये भाग घेतला. त्यावेळी प्रशिक्षक रणदेब बोस यांनी त्यांची प्रतिभा ओळखली. बोस यांच्याच सांगण्यावरून मुकेशला ईडन गार्डन्समधील एका खोलीत राहण्यासाठी जागाही मिळाली. 2015 मध्ये मुकेशने बंगालसाठी पदार्पण केले.
मुकेशने रणजी सामन्यांमध्ये बंगालकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. त्याच्या कामगिरीचे त्याला फळही मिळाले आणि मुकेशचा भारतीय-अ संघात समावेश करण्यात आला. एवढेच नाही तर यावर्षी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. तो याअगोदर दिल्ली कॅपिटल्स संघाचाच नेट गोलंदाज राहिलेला आहे.
मुकेश कुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 33 सामन्यात 123 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने सहा वेळा एका डावात चार आणि सहाच वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर लिस्ट ए क्रिकेटच्या 24 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये मुकेशने 23 सामन्यात 25 विकेट घेतल्या आहेत.