Team India : राहुलसाठीच इशानवर अन्याय; बीसीसीआयच्या सुत्रांनीच दिली धक्कादायक माहिती…

Updated On:-2 फोटो
Photo 1
1 / 2

आणखी संबंधित फोटो

Ishan Kishan, Lokesh Rahul & BCCI sources :- लोकेश राहुलचे संघातील स्थान निश्‍चित व्हावे यासाठी गेल्या वर्षीपासूनच इशान किशनवर सातत्याने अन्याय होत आहे, अशी धक्कादायक माहिती बीसीसीआयमधील एका सदस्याने सांगितले आहे. ऋषभ पंत अद्याप दुखापतीतून पूर्ण बरा झालेला नसून त्याच्या जागी कायमस्वरुपी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून राहुलचे भारतीय संघातील स्थान पक्के व्हावे यासाठीच इशानकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे, असेही या सदस्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

राहुल दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. त्यानंतर त्याने परदेशात शस्त्रक्रीया करुन घेतली व त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी दाखल झाला. त्यावेळी इशानला आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघात स्थान दिले गेले. त्याने या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत सलग ५ अर्धशतके फटकावली. त्याचवेळी तो पंतच्या जागी कायमस्वरुपी भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान पक्के करेल असेच चित्र होते.

दुसरीकडे राहुल तंदुरुस्त ठरला व बीसीसीआयच्या अलिखित नियमानूसार तो संघात परतला व इशानला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. सलग पाच एकदिवसीय सामन्यात अर्धशतके फटकावत विक्रम साकार केलेल्या इशानकडे राहुल फिट ठरला त्यानंतर जाणूनबुजुन दुर्लक्ष केले जाऊ लागले. त्याचवेळी श्रेयस अय्यरही संघात परतला त्यावेळी राहुल केवळ एक फलंदाज म्हणूनच संघात राहील असेही निवड समितीने सांगितले मात्र, प्रत्यक्षात इशानच्या जागी अनेक पर्याय खेळवून पाहील गेले. केएस भरतपासून हे प्रयोग सुरु झाले. मात्र, इशानसारखे सातत्य कोणीही दाखवू शखले नाही. मात्र, निवड समितीच्या दबावाखाली राहुलचे स्घातील स्थान निश्‍चित जाले व इशानला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्याचवेळी राहुललाच भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिले गेले व इशान दुखावला गेला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान आपल्याला विश्रांती हवी आहे असे कारण देत त्याने बीसीसीआयची परवानगी घेत मायदेशी परतला.

त्याचवेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी इशानचे काहीतरी बिनसल्याच्या चर्चांनी जोर धरला. अर्थात या दोघांनीही त्यावर भाष्य करणे टाळले. मात्र, इशानला जर भारतीय संघात परत यायचे असेल तर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहीजे, असा सल्ला द्रविड यांनी दिला होता. तो डावलत इशानने देशांतर्गत रणजी स्पर्धेत एकही सामना खेळला नाही व बडोदात किरण मोरे अकादमीत हार्दिक व कृणार या पंड्या बंधूंसह सराव सुरु केला. त्यावेळी हा सराव भारतीय संघात परतण्यासाठी नसून केवळ आयपीएल स्पर्धेसाठी आहे हे लक्षात आल्यावर बीसीसीआयने संताप व्यक्त केला. तसेच इशान, अय्यरसह अनेक खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेत खेळावेच लागेल असे फर्मानही काढले. मात्र, तरीही इशानने रणजी स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यातूनही अंग काढून घेत बीसीसीआयशी पंगा घेतला. त्यावेळी बीसीसीआयने अशा खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

World Table Tennis Team C’Ships 2024 : स्टार खेळाडू मनिकाच्या कामगिरीने भारताची उझबेकीस्तानवर मात…

मात्र, तरीही इशानने हा आदेश मान्य केला नाही. त्यामुळेच आता असे सांगितले जात आहे की जोपर्यंत इशानसारखे खेळाडू देशांतर्गत स्पर्धेतील काही संख्येने सामने खेळणार नाहीत त्यांचा भारतीय संघ निवडीसाठी विचार केला जाणार नाही. मात्र, इशान मुळातच भरात होता, त्याने केवळ रोहित शर्मा व विराट कोहलीसारखी विश्रांती मागितील होती. तरीही केवळ त्याच्याबाबतच आकस का ठेवला जात आहे, असा प्रश्‍नही आता निर्माण होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीही त्याचा विचार का करण्यात आला नाही असाही प्रश्‍न उरला आहे.

काय कारवाई होणार…

रणजी स्पर्धा अखेरच्या टप्प्यावर आली आहे. त्यानंतर ज्या देशांतर्गत स्पर्धा होतील त्या आयपीएल स्पर्धा पार पडल्यावर होणार आहेत. तोपर्यंत इशान देशांतर्गत स्पर्धा खेळणारच नाही. तसेच या कालावधीत तो आयपीएल स्पर्धेत खेळेल मग त्यातील कामगिरीच्या आधारे त्याची संघात निवड होणार का बीसीसीआयचा आदेश धूडकावल्यामुळे कारवाई होणार असा प्रश्‍न आहे. त्यातच कारवाई झाली तर ती कोणती असेल याबाबतही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Photo Gallery : रवींद्र जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद; विराटसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे…

बुमराहला विश्रांती..

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला रांची येथे होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता चौथा कसोटी सामना रांची येथे येत्या २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. त्यात बुमराहला विश्रांती दिली जाणार आहे. सध्या रणजी सामन्यात खेळत असलेला नवोदित वेगवान गोलंदाज मुकेश कुमार चौथ्या कसोटसाठी भारतीय संघात दाखल होणार आहे. त्यानंतर बुमराह पाचव्या कसोटीसाठी संघात परतेल. हा कसोटी सामना येत्या ७ ते ११ मार्च या कालावधीत धर्मशाला येथे होत आहे.

पाटीदारचे स्थान धोक्यात

भारतीय संघाचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज लोकेश राहुल संघात परतणार असल्याने चौथ्या कसोटीतून रजत पाटीदारला वगळले जाणार आहे. राहुलला दुखापत झाल्याने त्याने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. मात्र आता तो मॅचफिट ठरला असल्याने या कसोटीत तो खेळणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

IND vs PAK Final : आशियाडमध्ये रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल! सुवर्णपदकासाठी होणार हायव्होल्टेज लढत

IND vs PAK Final : आशियाडमध्ये रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल! सुवर्णपदकासाठी होणार हायव्होल्टेज लढत

Top 10 Sports News : १३ वर्षांनंतर चॅम्पियन, १९-० चा धुव्वा अन् ७२ व्या वर्षी निकाह; क्रीडा जगतातील १० मोठ्या घडामोडी!

Top 10 Sports News : १३ वर्षांनंतर चॅम्पियन, १९-० चा धुव्वा अन् ७२ व्या वर्षी निकाह; क्रीडा जगतातील १० मोठ्या घडामोडी!

Ishan Kishan Record : इशान किशनने मोडला दिनेश कार्तिकचा १६ वर्षे जुना विक्रम; दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये रचला नवा इतिहास

Ishan Kishan Record : इशान किशनने मोडला दिनेश कार्तिकचा १६ वर्षे जुना विक्रम; दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये रचला नवा इतिहास

Duleep Trophy Final : दुलीप ट्रॉफी फायनल ड्रॉ झाली तर कोणता संघ होणार विजेता? काय आहे BCCI चा नियम?

Duleep Trophy Final : दुलीप ट्रॉफी फायनल ड्रॉ झाली तर कोणता संघ होणार विजेता? काय आहे BCCI चा नियम?