NCP Alliance Update | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. याबाबत दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकही पार पडली. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये चर्चा झाली. पवारांचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांनी अजित पवारांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीसंबंधी अंतिम चर्चाही केल्याचं समोर आलं. परंतु यात आता एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. पुण्यातील युती ही चिन्हाच्या वादावरुन फिस्कल्याची माहिती समोर आली आहे. NCP Alliance Update | चिन्हांवरून दोन्ही पक्षात मतभेद कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमधील बोलणी फिस्कटली असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडून पुण्यातील सर्व उमेदवारांसाठी घड्याळ्याच्या चिन्हाचा आग्रह करण्यात आला. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या उमेदवारांसाठी तुतारी चिन्हावर ठाम असल्याची माहिती आहे. या चिन्हांवरून दोन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले. युती फिस्कटल्याने महाविकास आघाडी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. पुण्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा वेगळे वळण घेतले असून, शरद पवार गटाने तातडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची तातडीची बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. NCP Alliance Update | दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चिन्हाचा वाद निर्माण झाल्याने त्याचा परिणामपुण्यासोबत पिंपरी चिंचवड, ठाणे आणि इतर ठिकाणीही होण्याची शक्यता आहे. हेही वाचा: Pune Weather Update: सलग दुसऱ्या दिवशी तापमान स्थिर; नव्या वर्षात थंडीचा मुक्काम वाढणार?