Purandar : वाल्ह्याच्या बाजारात लक्ष्मीची आवक वाढली
Purandar : आधुनिक काळातही नागरिक केरसुणी खरेदीसाठी विशेष पसंती दाखवत आहेत. शिंदीच्या झाडापासून तयार केलेल्या केरसुणी दिवाळी पूजनासाठी महत्त्वाचे स्थान असल्याचे पुरोहित सचिन देशपांडे यांनी सांगितले.

वाल्हे : वाल्हे (ता. पुरंदर) येथील मंगळवार (दि.३) आठवडे बाजार हा दिवाळी सणाच्या वस्तूंच्या खरेदी होता. धनपूजन व लक्ष्मी (केरसुणी) पूजन केले जाते. लक्ष्मीपूजननिमित्त नवीन झाडू विकत घेण्याची आणि तिला ‘लक्ष्मी’ मानून पूजा करण्याची हिंदू संस्कृतीतील पारंपरिक प्रथा आहे. पूजनासाठी लागणारी लक्ष्मी (केरसुणी) वाल्हे येथील आठवडे बाजारात आवक वाढल्यामुळे केरसुणीला योग्य किंमत मिळाली नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली. एका केरसुणीला ८० ते १०० रूपयांपर्यंत किंमत मिळाली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केरसुणी बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहे. आधुनिक काळातही नागरिक केरसुणी खरेदीसाठी विशेष पसंती दाखवत आहेत. शिंदीच्या झाडापासून तयार केलेल्या केरसुणी दिवाळी पूजनासाठी महत्त्वाचे स्थान असल्याचे पुरोहित सचिन देशपांडे यांनी सांगितले. केरसुणी बनवण्यासाठी शिंदीच्या झाडांच्या फांदीचा वापर केला जातो. मात्र, या झाडांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असल्याने महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून केरसुणी आणावी लागत आहे. कच्चा माल तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने रेडीमेड केरसुणी विक्रीसाठी आणावी लागत असल्याचे व्यावसायिक संतोष सपकाळ यांनी दिली.
पंधरा टक्क्यांनी महागाईची झळ
महागाईमुळे केरसुणीचे दर यंदा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढल्याने विक्रेत्यांनी सांगितले. आठवडे बाजारात विविध प्रकारचे लक्ष्मी पावले विविध वस्तू बाजारात विक्रीस आल्या आहेत. महिलांकडून या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यंदा मोठी केरसुणी १०० रुपये तर छोटी केरसुणी ८० रुपये दराने विकली जात आहे. देवघरासाठीच्या केरसुणीची किंमत ३० रुपये असल्याची माहिती केरसुणी विक्रेते संतोष सपकाळ, सुलोचना सपकाळ यांनी दिली.





