INDW vs AUSW : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाने गुलाबी जर्सी का परिधान केली? जाणून घ्या

INDW vs AUSW Why Team India Pink Jersey : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमध्ये सध्या सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आज, 20 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर तिसरा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे.
या सामन्याचा विजेता मालिकेवर आपले नाव कोरेल. तत्पूर्वी बीसीसीआयने या सामन्यासाठी एक विशेष पाऊल उचलले आहे. भारतीय महिला संघ आज पारंपरिक निळ्या जर्सीऐवजी गुलाबी जर्सी परिधान केली आहे, ज्यामागे स्तन कर्करोगाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश आहे.
बीसीसीआयचा सामाजिक संदेश –
𝙏𝙝𝙖𝙣𝙠𝙨 𝙖 𝘿𝙤𝙩! 🩷#TeamIndia will be wearing special pink-coloured jerseys in the Third ODI today to promote Breast Cancer Awareness, in partnership with @SBILife 👏👏#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/qnJukLLxoh
— BCCI Women (@BCCIWomen) September 20, 2025
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर याबाबतची माहिती शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भारतीय महिला खेळाडू गुलाबी जर्सीमध्ये दिसत आहेत. या उपक्रमाद्वारे स्तन कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संदेश खेळाडू देत आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरसह संपूर्ण संघ या सामाजिक मोहिमेचा भाग बनला आहे. चाहत्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
हेही वाचा – IND vs OMA : संजूचा शॉट हार्दिकसाठी ठरला ‘दुर्दैवी’, फक्त पाहतच राहिला पंड्या! VIDEO व्हायरल
ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आणि भारतीय संघापुढील आव्हान –
महिला क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया नेहमीच अजेय संघ मानला गेला आहे. त्यांनी एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक सर्वाधिक वेळा जिंकले आहेत. भारताविरुद्ध त्यांचे वर्चस्व आणखी स्पष्ट आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 58 एकदिवसीय सामने खेळले गेले, ज्यामध्ये भारताला केवळ 11 वेळा विजय मिळाला, तर ऑस्ट्रेलियाने 47 सामने जिंकले. भारताने आजपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली जर भारताने आजचा सामना जिंकला, तर ही ऐतिहासिक कामगिरी ठरेल.
हेही वाचा – IND vs OMA : सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताचा निसटता विजय, ओमानच्या कलीम-मिर्झाच्या खेळीने वेधलं लक्ष
मालिकेचा रोमांचक टप्पा –
या मालिकेतील पहिले दोन सामने न्यू चंडीगढमधील मुल्लापूर स्टेडियमवर खेळले गेले. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. आता तिसरा सामना मालिकेचा विजेता ठरवेल. हा सामना एकदिवसीय विश्वचषकापूर्वी होत असल्याने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.





