IND vs OMA : संजूचा शॉट हार्दिकसाठी ठरला ‘दुर्दैवी’, फक्त पाहतच राहिला पंड्या! VIDEO व्हायरल

IND vs OMA Hardik Pandya Run Out Video : आशिया कप 2025 च्या 12व्या सामन्यात भारत आणि ओमान आमनेसामने आहेत. या सामन्यात भारतीय संघाने नाणफेके जिंकून प्रथम फलंदाजी करताना, संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ओमानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. कारण टॉप ऑर्डरमधील दोन महत्त्वाचे फलंदाज जलद माघारी परतले. दरम्यान, चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या हार्दिक पंड्याला दुर्दैवीपणे बाद व्हावे लागले.
हार्दिक पंड्या ठरला दुर्दैवी –
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला 6 धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल 5 धावा काढून क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी रचली. अभिषेकने आक्रमक फलंदाजी करत 38 धावा केल्या, परंतु तो झेलबाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याला फलंदाजी क्रमवारीत बढती देण्यात आली आणि तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. हार्दिकने नुकतेच आपले खाता उघडले होता आणि तो नॉन-स्ट्रायकरच्या टोकावर उभा होता.
नसीब का खेल! 💔 Hardik बस ज़रा सी उंगली के स्पर्श से आउट हो गए। #HardikPandya #INDvOMAN #AsiaCup2025 #क्रिकेट #TeamIndia #CricketFever” pic.twitter.com/ZfPR45xm1N
— Amrit (@Yasmin621065515) September 19, 2025
Hardik Pandya dismissed for just 1 run 💔
Unlucky run out 🥲#HardikPandya #INDvOMAN #INDvOMN #INDvOMA #AsiaCup #AsiaCup2025 pic.twitter.com/a7med0Ny8K
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) September 19, 2025
भारतीय डावातील आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने समोरच्या दिशेने जोरदार फटका मारला. ओमानचा गोलंदाज जितेन रामानंदीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. संजूने फटका मारताच हार्दिक क्रीझबाहेर पडला होता, पण तो वेळेत परत येऊ शकला नाही. यष्ट्यांवर चेंडू लागताच हार्दिक स्वतःहून तंबूकडे परतला.
हेही वाचा – Jiten Ramanandi : कोण आहे जितेन रामानंदी?ज्याने एकाच षटकात अभिषेक-हार्दिला दाखवला तंबूचा रस्ता
अर्शदीपही हार्दिकप्रमाणे झाला रनआऊट –
यानंतर रामानंदीने हार्दिकप्रमाण अर्शदीप सिंगला रनआऊट करत भारताला आठवा धक्का दिला. हर्षितने सरळ शॉट खेळला जो रामानंदीच्या हाताला लागल्यावर स्टंपवर आदळला, त्यादरम्यान अर्शदीप क्रीजबाहेर होता. ज्यामुळे फक्त एक धाव करुन माघारी जावे लागले. जितेन रामानंदीच्या या शानदार कामगिरीने ओमानने भारताला कडवी टक्कर दिली असली, तरी भारतीय संघाने 8 गडी गमावून 189 धावांचे लक्ष्य दिले आहे.





