IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

Indian Women’s Cricket Team Announced for England Series : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. सुरुवातीला भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर, दोन्ही संघ एकदिवसीय स्वरूपात स्पर्धा करतील. टी-२० मालिका २८ जूनपासून सुरू होत आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १६ जुलै रोजी खेळला जाईल. अशाप्रकारे, या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंडमध्ये एकूण ८ सामने खेळवले जातील.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी अनुभवी हरमनप्रीत कौरला संघाचे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर सलामीवीर स्मृती मानधनाला संघाची उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. स्फोटक सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा संघात परतली आहे. याशिवाय, सायली सातघरेचाही या फॉरमॅटच्या संघात समावेश करण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर श्री चरणी, शुची उपाध्याय, क्रांती गौड, अमनजोत कौर आणि स्नेह राणा यांना संघात कायम ठेवण्यात आले आहे.
For more details regarding #ENGvIND click 🔽https://t.co/LqjBS2oDBR#TeamIndia https://t.co/HcHC8Dr2Vt
— BCCI Women (@BCCIWomen) May 15, 2025
एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी महत्त्वाची मालिका –
एकदिवसीय विश्वचषकापूर्वी इंग्लंडविरुद्धची ही मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. भारताकडे विश्वचषकाचे यजमानपद आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडियासाठी या मर्यादित षटकांच्या मालिकेत तयारी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. यासोबतच असेही म्हटले जात आहे की भारतीय संघाचा विश्वचषक संघ जवळजवळ याच संघातून ठरवला जाईल.
हेही वाचा – IPL 2025 : डब्ल्यूटीसी फायनलमुळे आयपीएल प्लेऑफवर संकट! काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या
टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चर्नी, शुची उपाध्याय, अरविंद उपाध्याय, अरुंधतीरेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे.





