Bengaluru Stampede : RCB वर बंदीची टांगती तलवार; चेंगराचेंगरीमुळे कर्नाटक सरकारचा कठोर निर्णय

Bengaluru Stampede case update : आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर बंगळुरूमध्ये जल्लोष पाहायला मिळाला, जो चेंगराचेंगरीत रूपांतरित झाला. यावेळी काढण्यात आलेल्या विजयी रॅलीचे योग्य नियोजन न झाल्याने अनेक लोक जखमी झाले, तर ११ लोकांचा मृत्यू झाला आणि आरसीबीसाठी अडचणी वाढल्या. आता कर्नाटक सरकारने आरसीबीविरोधात कठोर निर्णय घेतला आहे.
आरसीबीच्या अडचणी वाढल्या –
जस्टिन जॉन मायकेल डी’कुन्हा न्याय आयोगाने बंगळुरूतील चेंगराचेंगरीची चौकशी पूर्ण केली आहे. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन, डीएनए एंटरटेनमेंट आणि बंगळुरू पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवले. कर्नाटक सरकारने याला मंजुरी दिली असून, यामुळे सर्वांविरुद्ध कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. ४ जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली होती, ज्यात सुमारे ५० लोक जखमी आणि ११ जणांचा मृत्यू झाला होता.
BREAKING 🚨
Karnataka Cabinet has decided to file criminal cases against RCB and KSCA for security lapses and negligence that led to the Bengaluru stampede. (Source: TheHindu) pic.twitter.com/89GjfpS61q
— ` (@WorshipDhoni) July 24, 2025
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांना सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. तरीही विजयी रॅली काढण्यात आली आणि त्यामुळे एक मोठी दुर्घटना घडली. ही आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, डीएनए एंटरटेनमेंट आणि बंगळुरु पोलिस अधिकाऱ्यांची मोठी चूक मानली गेली आहे. बंगळुरु पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता असतानाही केवळ 79 पोलिस कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, स्टेडियमबाहेर रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती आणि सहपोलिस आयुक्त जवळपास 30 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले.
हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतच्या जिद्दीला सलाम! दुखापतग्रस्त असतानाही अर्धशतक झळकावत लावली विक्रमांची रांग
आरसीबीवर बंदी घातली जाऊ शकते का?
आरसीबीसाठी परिस्थिती हळूहळू कठीण होत आहे. त्यांच्यावर स्पष्टपणे दोष ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्नाटक सरकारच्या निर्णयानंतर सर्वांचे लक्ष बीसीसीआयकडे असेल. या निष्काळजीपणाबद्दल आरसीबीवरही कारवाई होऊ शकते. बीसीसीआय त्यांच्यावर एका हंगामासाठी बंदी घालण्याची शक्यता आहे. ही बाब विराट कोहली आणि बंगळुरुच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी ठरू शकते.





