IPL 2024 (#GTvMI Match 5) : रोमांचक सामन्यात गुजरातचा विजय, मुंबई 6 धावांनी पराभूत…

IPL Live Cricket Score, GT vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा पाचवा सामना रविवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 17 व्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. गुजरातने मुंबईवर 6 धावांनी विजय मिळवला.
गुजरातने मुंबईला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरात मुंबई संघ 20 षटकांत नऊ गडी गमावून 162 धावाच करू शकला. मुंबई यासह 2012 नंतर आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरली.
विजयासाठी 169 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात मुंबईला पहिला धक्का बसला. फलंदाजीला सुरुवात करण्यासाठी आलेला इशान किशन खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला अजमतुल्ला उमरझाईने यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर लगेचच मुंबईला दुसरा धक्का 30 धावसंख्येवर बसला. इशान किशननंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नमन धीर 10 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले.
त्यानंतर मुंबईला तिसरा धक्का 107 धावांच्या स्कोअरवर रोहित शर्माच्या रूपाने बसला. 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो साई किशोरच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. हिटमॅनने 29 चेंडूंत सात चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नमन धीरची विकेट पडल्यानंतर संघाला चांगल्या भागीदारीची गरज होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला डेव्हॉल्ड ब्रेविस आणि रोहित यांच्यात 77 धावांची भागीदारी झाली.
मुंबईची चौथी विकेट डेव्हॉल्ड ब्रेविसच्या रूपाने पडली. 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोहित शर्माने त्याला आपला बळी बनवले. ब्रेविस गुजरातविरुद्ध दमदार कामगिरी करताना दिसत होता. त्याने 38 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. ब्रेविस माघारी परतला तेव्हा संघाला विजयासाठी 25 चेंडूत 40 धावांची गरज होती.
त्यानंतर राशिद खानने 17 व्या षटकात केवळ तीन धावा दिल्या. त्यावेळी मुंबई इंडियन्सची धावसंख्या आता 4 विकेटवर 133 धावा अशी होती आणि मुंबईला विजयासाठी 18 चेंडूत अजून 36 धावा धावांची गरज होती.
संघाला 18व्या षटकात विजयासाठी 36 धावांची गरज होती. अशा स्थितीत कर्णधार पंड्याने टीम डेव्हिडवर विश्वास व्यक्त केला. त्याने मोहित शर्माविरुद्ध कठोर भूमिका घेतली आणि ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर प्रत्येकी दोन धावा घेतल्या. पाचव्या चेंडूवर त्याला एकही धाव मिळाली नाही. शर्माने शेवटच्या चेंडूवर टीम डेव्हिडला बाद केले. तो 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर 19 वे आणि महत्त्वाचे षटक स्पेन्सर जॉन्सनने टाकले, ज्याला याआधी वाईट पद्धतीने फटका बसला होता. तिलकक वर्माने पहिल्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला असला तरी दुसऱ्याच चेंडूवर तिलकने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. जॉन्सनच्या या षटकात 8 धावा आल्या आणि शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सला 19 धावांची गरज होती.19 षटकांनंतर मुंबईची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात 150 धावा होती.
20व्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याला उमेश यादवसमोर मोठे फटके खेळावे लागले. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकाराने मुंबईच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या होत्या, पण तिसऱ्या चेंडूवर चुकीच्या वेळेवर मारलेल्या शॉटमुळे हार्दिक लाँग-ऑनवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर पियुष चावलाही पॅव्हेलियनमध्ये परतला. उमेश यादवला हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नाही, पण गुजरातचा 6 धावांनी विजय निश्चित केला.
गुजरातकडून अजमतुल्ला उमरझाई, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी साई किशोरने यश संपादन केले.
तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरातला प्रथम खेळताना 20 षटकात केवळ 168 धावा करता आल्या आहेत. वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी गुजरातला चांगली सुरुवात करून दिली होती आणि मधल्या फळीच्या आक्रमक वृत्तीनंतरही गुजरात टायटन्सला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
Wickets at regular intervals, another magical Boom spell.. 💙
..𝘼𝙉𝘿 𝙏𝙃𝙀 𝘾𝙃𝘼𝙎𝙀 𝙄𝙎 𝙊𝙉 💪🏃#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #GTvMI pic.twitter.com/PfPnIfRq9y
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2024
कर्णधार शुभमन गिलने 22 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 3 चौकार आणि 1 षटकारही लगावला. गिल याला पियुष चावला याने रोहित शर्मांकरवी झेलबाद केलं. रिद्धिमान साहाने 15 चेंडूत 19 धावा केल्या, पण जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच षटकात त्याला बोल्ड केले. साई सुदर्शननेही शानदार फलंदाजी करत 38 चेंडूत 45 धावांची खेळी केली. सुदर्शनला बुमराहने तिलक वर्माकरवी झेलबाद केलं.
16व्या षटकापर्यंत गुजरात टायटन्सने 133 धावा केल्या होत्या, मात्र 17व्या षटकात जसप्रीत बुमराहने आपल्या षटकात 2 बळी (डेविड मिलर,साई सुदर्शन) घेत गुजरातच्या फलंदाजीला बॅकफूटवर आणले. पण दरम्यान, राहुल तेवतियाच्या झंझावाती ( 15 चेंडूत 22 ) खेळीने गुजरातच्या आशा वाढल्या होत्या, पण तोही संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकला नाही.
विशेषत: शेवटच्या दोन षटकांत गुजरातचा संघ पूर्णपणे हतबल झाला. एकीकडे बुमराहने 19व्या षटकात केवळ 7 धावा दिल्या आणि 20व्या षटकात जेराल्ड कोएत्झीनेही गुजरातला 170 धावांच्या आत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-live-cricket-score-rr-vs-lsg-indian-premier-league-2024-match-4-rajasthan-royals-won-by-20-runs/
मुंबई इंडियन्सने केला 7 गोलंदाजांचा वापर…
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील एक मनोरंजक तथ्य म्हणजे मुंबई संघाने 7 गोलंदाजांचा वापर केला. पियुष चावलाने शुभमन गिलची विकेट नक्कीच घेतली, पण त्याने 3 षटकात 31 धावा दिल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त हार्दिक पांड्यानेही अनेक धावा दिल्या. हार्दिकने 3 षटकांत 30 धावा दिल्या, मात्र जसप्रीत बुमराहसमोर गुजरातच्या फलंदाजांना यश मिळाले नाही. बुमराहने 4 षटकात केवळ 14 धावा देत 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. दरम्यान, 18व्या षटकात ल्यूक वुडच्या षटकात राहुल तेवतियाने 19 धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराह आणि जेराल्ड कोएत्झी यांनीही शेवटच्या 2 षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली. जेराल्ड कोएत्झीने 4 षटकात 27 धावा देत 2 गडी बाद केले.





