Yuzvendra Chahal : सततच्या दुर्लक्षामुळे युझवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय, आता ‘या’ देशाच्या संघातून खेळणार…

Yuzvendra Chahal Debut For Northamptonshire : टीम इंडियामध्ये सातत्याने दुर्लक्ष होत असलेला भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहलने मोठा निर्णय घेतला आहे. युझवेंद्रने इंग्लंडला जाऊन कौंटी क्रिकेट खेळण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. चहल नॉर्थम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळताना दिसणार आहे. नॉर्थम्प्टनशायरने 2024 काउंटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय चषक हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी भारतीय लेगस्पिनरशी करार केला आहे.
नॉर्थहॅम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबने चहल संघात सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल केंटमधील अंतिम एकदिवसीय चषक सामन्यासाठी आणि काउंटी चॅम्पियनशिपच्या उर्वरित पाच सामन्यांसाठी क्लबमध्ये सामील होईल. आणि त्यानंतर लाल चेंडू मोहिमेच्या उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध असेल.
Welcome to Northamptonshire, @yuzi_chahal! 🏵️
The Indian spinner will be available for all remaining @CountyChamp fixtures and today’s @onedaycup game against Kent. 🌪️
Read more 👉 https://t.co/bLMrdJEv4L pic.twitter.com/rE5cJmGyyO
— Northamptonshire Steelbacks (@NorthantsCCC) August 14, 2024
दरम्यान, यापूर्वी केंट क्रिकेटने भारताचा आंतरराष्ट्रीय लेग-स्पिनर युझवेंद्र चहलला 2023 काउंटी चॅम्पियनशिपमध्ये तीन सामन्यांसाठी करारबद्ध केले होते आणि त्यावेळी शेवटच्या तीन डिव्हिजन वन सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये त्याने 9 विकेट घेतल्या होत्या.
क्लबचे मुख्य प्रशिक्षक जॉन सॅडलर म्हणाले, “युझवेंद्र हा एक उच्च दर्जाचा खेळाडू आहे जो त्याच्यासोबत अनुभव आणि अविश्वसनीय कौशल्यांचा खजिना घेऊन आला आहे. त्याच्या रिकाॅर्डवरून हे दिसून येते आणि त्याची विकेट घेण्याची क्षमता आमच्या आक्रमणाला बळ देईल.”
सतत होतंय दुर्लक्ष….
युझवेंद्र चहल गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाचा नियमित भाग नाही. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत चहलचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यांच्या जागी अक्षर पटेल आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आली होती. चहलने भारतासाठी शेवटचा सामना 13 ऑगस्ट 2023 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.





