Tilak Varma Girlfriend : ‘ही’ सुंदर महिला क्रिकेटपटू आहे तिलक वर्माची गर्लफ्रेंड? व्हायरल फोटोंमुळे चर्चेला उधाण

Tilak Varma Girlfriend Indu Barma : टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्मा आणि नेपाळची महिला क्रिकेटपटू इंदु बर्मा यांच्या अफेअरच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर चांगलाच जोर धरला आहे. दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल अनेक पोस्ट्स व्हायरल होत आहेत, ज्यात नेपाळी क्रिकेटरसोबत तिलक वर्माचे फोटो देखील दिसत आहेत. मात्र, या व्हायरल पोस्ट्स आणि फोटोंची सत्यता काय आहे? जाणून घेऊया.
कोण आहे इंदु बर्मा?
२८ वर्षीय इंदु बर्मा नेपाळच्या महिला क्रिकेट संघाची सदस्य आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करणारी अष्टपैलू खेळाडू आहे. तिने आत्तापर्यंत नेपाळसाठी ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात तिने फलंदाजीत १०४१ धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत ४० विकेट्स घेतले आहेत. इंदु तिच्या दमदार खेळासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही महिला क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. सध्या तिची गणना जगातील टॉप-१० महिला क्रिकेटपटूंमध्ये केली जाते.
Tilak Varma is allegedly in a relationship with Nepali cricketer Indu Barma.#TilakVarma pic.twitter.com/36XrPtJJzJ
— Albert (@Albertbhaiii) December 14, 2025
तिलक वर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
CAPTAIN FANTASTIC!
Indu Barma’s unbeaten 48* anchors a brilliant chase as the Nepal Women’s team registers a dominant 6-wicket win in the Fifth T20I against Malaysia. #NepalWomen #Cricket #InduBarma #SeriesAllEven #NepalCricket #T20Cricket #GoNepal #ICTFRAME pic.twitter.com/j33T0hD251
— ICT Frame (@ictframe) October 7, 2025
तिलक वर्मा सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे. यंदा भारताने पाकिस्तानला हरवून जो आशिया कप जिंकला, त्यात अंतिम सामन्यात तिलक वर्माची भूमिका महत्त्वाची होती. डावखुरा फलंदाज असलेल्या तिलकने भारतासाठी आतापर्यंत ५ एकदिवसीय आणि ३८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
हेही वाचा – IND U19 vs PAK U19 : हेल्मेटवर चेंडू लागला, तरी डगमगला नाही! जॉर्जने झुंजार खेळी साकारत सावरला भारताचा डाव
सोशल मीडियावरील चर्चांची सत्यता काय?
तिलक वर्मा आणि इंदु बर्मा यांच्यातील कथित प्रेमसंबंधांच्या चर्चांवर अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. तिलक वर्मा भारतासाठी अनेक देशांमध्ये क्रिकेट खेळला आहे, पण त्याने नेपाळमध्ये कधीही क्रिकेट खेळलेले नाही. मग दोघांची भेट झाली कशी आणि त्यांच्यात संबंध कसे जुळले?
हेही वाचा – लिओनेल मेस्सी आज मुंबईत; ‘प्रोजेक्ट महादेव’चा करणार शुभारंभ
हेच प्रश्न सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर विश्वास ठेवू देत नाहीत. विशेषतः, व्हायरल पोस्टमध्ये तिलक आणि इंदुचे जे फोटो दाखवले जात आहेत, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) तयार केलेले असल्यासारखे दिसत आहेत. त्यामुळे, या अफवांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत मोठी शंका व्यक्त केली जात आहे.





