IND U19 vs PAK U19 : हेल्मेटवर चेंडू लागला, तरी डगमगला नाही! जॉर्जने झुंजार खेळी साकारत सावरला भारताचा डाव

The ball hit Aaron George’s helmet : अंडर-१९ एशिया कप २०२५ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना सध्या दुबई येथे सुरू आहे. या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचा सुपरस्टार वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी साकारण्यात अपयश आले असले तरी, आरोन जॉर्जने मात्र आपल्या बॅटने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दरम्यान, एक चेंडू त्याच्या हेल्मेट लागला, ज्यामुळे सामन्यात थोड्या वेळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
आरोन जॉर्जने साकारली झुंजार खेळी –
आरोन जॉर्जने या सामन्यात ८८ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तो शतकापासून केवळ १५ धावा दूर असताना बाद झाला. या खेळीदरम्यान त्याला एक दुखापतही झाली. पाकिस्तानचा गोलंदाज अली रझाने टाकलेल्या १४ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू थेट जॉर्जच्या हेल्मेटवर आदळला.
Scary moment as Aaron George is treated after a blow to the head, right on the center of the helmet.#U19AsiaCup #Dubai #TeamIndia #INDU19vPAKU19 #INDvPAK #AsiaCup pic.twitter.com/mwqkCWoYaI
— lightningspeed (@lightningspeedk) December 14, 2025
हा चेंडू लागल्यानंतर तो वेदनेत दिसला, ज्यामुळे संघाचे फिजिओ तात्काळ मैदानात धावले. त्यांचे कन्कशन टेस्ट देखील करण्यात आले. मात्र, जॉर्जने खिलाडूवृत्ती दाखवत आणि दुखापतीवर मात करत मैदानात टिकून राहण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे संघाला मोठा आधार मिळाला.
हेही वाचा – लिओनेल मेस्सी आज मुंबईत; ‘प्रोजेक्ट महादेव’चा करणार शुभारंभ
जॉर्ज व्यतिरिक्त या खेळाडूंनी दिले योगदान –
Elegance in elevation 👌
Ayush Mhatre & Aaron George showcasing their skillset.
Watch #INDvPAK at the #DPWorldMensU19AsiaCup2025 LIVE NOW, on Sony Sports Network TV channels & Sony LIV! #SonySportsNetwork #SonyLIV pic.twitter.com/ElmvnfI6Fq
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 14, 2025
जॉर्ज व्यतिरिक्त कर्णधार आयुष महात्रेने २५ चेंडूंमध्ये ३८ धावांची जलद खेळी करत मोलाचे योगदान दिले. तसेच, अभिज्ञान कुंडूनेही २२ धावांची उपयुक्त खेळी केली. दुसरीकडे, चाहत्यांना ज्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, तो वैभव सूर्यवंशी(फक्त ५ धावा) स्वस्तात बाद झाला. विहान मल्होत्रा, खिलान पटेल आणि वेंदात त्रिवेदी यांनाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
हेही वाचा –WBBL 2025 : १० वर्षांनंतर होबार्ट हरिकेन्सने पटकावले पहिले जेतेपद! RCB प्रमाणे केला ‘डबल’ धमाका
दरम्यान, यूएई विरुद्ध १७१ धावांची धमाकेदार खेळी करून संघाला २३४ धावांनी विजय मिळवून देणारा सूर्यवंशी लवकर बाद झाल्याने भारतीय संघाच्या धावसंख्येवर थोडा परिणाम झाला. ज्यानंतर भारतीय संघाचा डाव ४६.१ षटकांत २४० धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सय्यम आणि अब्दुल सुभान यांनी सर्वाधिक प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. आता पाकिस्तान संघाला विजय मिळवण्यासाठी २४१ धावांचे मिळाले आहे.





