Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकसाठी 84 भारतीय खेळाडू सज्ज,12 खेळात होणार सहभागी….

Paris Paralympics 2024 : आता पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतर पॅरालिम्पिक सुरू होणार आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. ज्यामध्ये जगभरातील हजारो खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यावेळी भारत पॅरिसमध्ये 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये 12 खेळांमध्ये भाग घेणार आहे. या खेळांसाठी भारत 84 खेळाडूंसह आपली सर्वात मोठी तुकडी पाठवणार आहे. भारताने 54 खेळाडू टोकियोला पाठवले होते, त्यात फक्त 14 महिला होत्या. पॅरिसच्या संघात 32 महिलांसह 84 खेळाडूंचा समावेश आहे.
ज्यामध्ये पॅरा सायकलिंग, पॅरा सेलिंग आणि दृष्टिहीन जूडो हे देशासाठी नवीन कार्यक्रम आहेत. याशिवाय तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, कॅनोइंग, पॉवरलिफ्टिंग, रोइंग, नेमबाजी, पोहणे, टेबल टेनिस आणि तायक्वांदो या खेळांचाही समावेश आहे. भारतीय पॅरालिम्पिक समितीने (PCI) बुधवारी केलेली घोषणा भारताच्या पॅरालिम्पिक अॅथलीट्समधील वाढती विविधता आणि प्रतिभा दर्शवते.
Indian Contingent for the Paris 2024 Paralympic Games. India is sending it’s largest ever contingent of 84 athletes.
Olympics is over. Now time to support our Para Athletes. Best wishes!#Paralympics2024 #TeamIndia pic.twitter.com/F1ykaAW5ev
— Rambo (@monster_zero123) August 14, 2024
आंध्र प्रदेशचा अर्शद शेख पॅरा सायकलिंगमध्ये पॅरालिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहे. आशियाई रोड पॅरा सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या एलिट वैयक्तिक वेळ चाचणी सी2 प्रकारात रौप्य पदक जिंकून त्याने आपला कोटा गाठला होता. आंध्र प्रदेशचा कोंगनापल्ले नारायण पॅरा रोइंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि हरियाणाची कोकिला कौशिकला दृष्टिहीन ज्युदोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.
India’s Largest-Ever Para Contingent Ready for Paris 2024! 🇮🇳
At a press conference held in Jaipur yesterday, the Paralympic Committee of India announced that 84 athletes will be competing across 12 sports, ready to make history at the Paris Paralympics! 💪✨
PCI President Sh.… pic.twitter.com/vIenLDT5iL
— Paralympic Committee of India (@PCI_IN_Official) August 14, 2024
भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झझाडिया यांनी सांगितले की, यावेळी 84 खेळाडूंचा संघ पॅरिसला पाठवला जात आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील कामगिरीची पुनरावृत्ती भारतीय खेळाडू करतील, अशी आशाही झझारिया यांनी व्यक्त केली आहे. टोकियोमध्ये भारताने 19 पदके जिंकली होती. ज्यामध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश होता . यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने 25 पदके जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भारताच्या पॅरालिम्पिकपटूवर पुन्हा एकदा टोकियोमधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची मोठी जबाबदारी असेल. प्रथमच सहभागी होणाऱ्या खेळाडूला इतिहास रचण्याची सर्वोत्तम संधी आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमधील खेळाडूंकडून भारताला खूप आशा आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने 9 सुवर्ण, 12 रौप्य आणि 10 कांस्य अशी एकूण 31 पदके जिंकली आहेत.
पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी…
पॅरा तिरंदाजी (6):- हरविंदर सिंह, राकेश कुमार ,श्याम सुंदर स्वामी ,पूजा , सरिता , शीतल देवी
पॅरा ॲथलेटिक्स (38)- दीप्ति जीवनजी – महिला 400 मीटर -T20, सुमित अंतिल – पुरुष भाला फेंक – F64, संदीप – पुरुष भाला फेंक – F64, अजीत सिंह – पुरुष भाला फेंक – F46, सुंदर सिंह गुर्जर – पुरुष भाला फेंक – F46, रिंकू – पुरुष भाला फेंक – F46, नवदीप – पुरुष भाला फेंक – F41, योगेश कथुनिया – पुरुष डिस्कस थ्रो – F56, धरमबीर – पुरुष क्लब थ्रो – F51, प्रणव सूरमा – पुरुष क्लब थ्रो – F51, अमित कुमार – पुरुष क्लब थ्रो – F51, निषाद कुमार – पुरुष ऊंची कूद – T47, राम पाल – पुरुष ऊंची कूद – T47, मरियाप्पन थंगावेलु – पुरुष ऊंची कूद – T63, शैलेश कुमार – पुरुष ऊंची कूद – टी63, शरद कुमार – पुरुष ऊंची कूद – टी63, सचिन सरजेराव खिलारी – पुरुष शॉट पुट – एफ46, मोहम्मद यासर, – पुरुष शॉट पुट – F46, रोहित कुमार – पुरुष शॉट पुट – F46, प्रीति पाल – महिला 100 मीटर – T35, महिला 200 मीटर – T35, भाग्यश्री माधवराव जाधव – महिला शॉट पुट – F34, मनु – पुरुष शॉट पुट – F37, परवीन कुमार – पुरुष भाला फेंक – F57, रवि रोंगाली – पुरुष शॉट पुट – F40, संदीप संजय गुर्जर- पुरुष भाला फेंक-F64, अरविंद – पुरुष शॉट पुट – F35, दीपेश कुमार – पुरुष भाला फेंक – F54, प्रवीण कुमार – पुरुष ऊंची कूद – T64, दिलीप महादु गावित – पुरुष 400 मीटर – T47, सोमन राणा – पुरुष शॉट पुट – F57, होकाटो होटोझे सेमा- पुरुष शॉट पुट – F57, साक्षी कसाना- महिला डिस्कस थ्रो- F55, करमज्योति- महिला डिस्कस थ्रो- F55, रक्षिता राजू- महिला 1500 मीटर T11, अमीषा रावत: महिला शॉट पुट – F46, भावनाबेन अजाबाजी चौधरी- महिला भाला फेंक – F46, सिमरन- महिला 100 मीटर T12, महिला 200 मीटर T12, कंचन लखानी- महिला डिस्कस थ्रो – F53.
पॅरा बॅडमिंटन (13):- मनोज सरकार- पुरुष एकेरी SL3, नितेश कुमार- पुरुष एकेरी SL3, मिश्र दुहेरी SL3-SU5, कृष्णा नागर- पुरुष एकेरी SH6, शिवराजन सोलाईमलाई- पुरुष एकेरी SH6, मिश्र दुहेरी SH6, सुहास यतिराज- पुरुष एकेरी SL4, मिश्र दुहेरी SL3-SU5, सुकांत कदम- पुरुष एकेरी S4, तरुण- पुरुष एकेरी S4, मानसी जोशी- महिला एकेरी SL3, मंदीप कौर- महिला एकेरी SL3, पलक कोहली- महिला एकेरी SL4, मिश्र दुहेरी SL3-SU5, मनीषा रामदास- महिला एकेरी SU5, तुलसीमथी मुरुगेसन- महिला एकेरी SU5, मिश्र दुहेरी SL3-SU5, नित्या श्री सिवन- महिला एकेरी SH6, मिश्र दुहेरी SH6
पैरा कैनो (3):- प्राची यादव, यश कुमार, पूजा ओझा
पॅरा सायकलिंग (2):- अरशद शेख, ज्योति गडेरिया
ब्लाइंड जूडो (2):- कपिल परमार: पुरुष -60 किलो जे1, कोकिला: महिला -48 किलो जे2
पॅरा पॉवरलिफ्टिंग (4):- परमजीत कुमार- पुरुष 49 किलो, अशोक- पुरुष 63 किलो, सकिना खातून- महिला 45 किलो, कस्तुरी राजमणी- महिला 67 किलो
पॅरा रोईंग (2):- अनिता- PR3 मिक्स डबल स्कल्स-PR3Mix2x, नारायण कोंगनापल्ले- PR3 मिक्स डबल स्कल्स-PR3Mix2x.
पॅरा स्विमिंग (1) :- सुयश नारायण जाधव – पुरुष 50 मीटर बटरफ्लाय – एस7.
पॅरा तायक्वांदो (1):- अरुणा- महिला K44- 47 किलो.
पॅरा टेबल टेनिस (2):- सोनलबेन पटेल- महिला एकेरी- WS3, महिला दुहेरी- WD10, भाविनाबेन पटेल- महिला एकेरी- WS4, महिला दुहेरी- WD10
पॅरा शूटिंग (10):- आमिर अहमद भट,अवनी लेखरा,मोना अग्रवाल,निहाल सिंह,मनीष नरवाल,रुद्रांश खंडेलवाल,सिद्धार्थ बाबू,श्रीहर्ष देवरड्डी रामकृष्ण,स्वरूप महावीर उन्हालकर,रूबीना फ्रांसिस





