Harsh Judo Gold : भारतीय जवानाचा ऐतिहासिक कारनामा! हर्ष सिंग भारताला जुडोमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा ठरला पहिला पुरुष खेळाडू
Harsh Judo Gold : भारताच्या हर्ष सिंगने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये सुवर्णपदक पटकवून सुवर्ण इतिहास लिहिला.

Harsh Singh Wins Gold Medal Mens 60kg Judo Glasgow CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow CWG 2026) भारतीय खेळाडूंनी जुडो (Judo) क्रीडा प्रकारात धुमाकूळ घातला आहे. राष्ट्रकुलच्या संपूर्ण इतिहासात भारताला जुडोमध्ये कधीही सुवर्णपदक मिळाले नव्हते. मात्र, अस्मिता डे हिने महिलांमध्ये ऐतिहासिक पहिले सुवर्ण जिंकल्यानंतर, अवघ्या काही मिनिटांतच भारताच्या हर्ष सिंग (Harsh Singh) याने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये सुवर्णपदक पटकवून सुवर्ण इतिहास लिहिला.
ऑस्ट्रेलियन खेळाडूला केले चीत!
पुरुष ६० किलो गटाच्या अंतिम सामन्यात २३ वर्षीय हर्ष सिंगचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ काट्झशी होता. हर्षने सामन्याच्या शेवटच्या मिनिटात अप्रतिम डाव टाकत ऑस्ट्रेलियन खेळाडूला पाठीवर मॅटवर आदळले आणि ‘वाजा-अरी’ (Waza-ari 10-0) च्या जोरावर ऐतिहासिक विजय नोंदवला.
HARSH SINGH WINS GOLD 🥇🔥🔥
He became Indian first ever male CWG Judo champion#CWG2026 #HarshSingh #Glasgow2026 #Judo pic.twitter.com/eLkZFUwdop
— The Useless (@The_Useless9) July 31, 2026
हर्षचा या स्पर्धेतील प्रवास थक्क करणारा राहिला. त्याने राउंड ऑफ १६ मध्ये मलावीच्या खेळाडूला आणि क्वार्टर फायनलमध्ये वानुआतुच्या खेळाडूला ‘इप्पोन’ने धूळ चारली. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलमध्ये दोन्ही ऑस्ट्रेलियन जुडोपटूंना पराभूत करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
भारतीय सैन्याचा जवान आहे हर्ष –
🚨Harsh Singh reacts after bagging gold in Judo – Men’s 60 kg@TataSteelLtd @RohanDC98 #CWG #Judo pic.twitter.com/Qcq9n9NTGx
— RevSportz Global (@RevSportzGlobal) July 31, 2026
हर्ष सिंग हा मुळचा पंजाबचा रहिवासी असून तो भारतीय सैन्यात (Indian Army) जवान म्हणून कार्यरत आहे. ‘आर्मी जुडो नोड’ अंतर्गत कठोर प्रशिक्षण घेत त्याने हे यश संपादन केले आहे. सध्या जागतिक क्रमवारीत (World Ranking) अव्वल १०० खेळाडूंमध्ये समाविष्ट असलेल्या हर्षने आपल्या या ऐतिहासिक कामगिरीने देश आणि भारतीय सैन्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
एकाच दिवशी जुडोमध्ये दोन सुवर्णपदके जिंकून भारतीय खेळाडूंनी ग्लास्गोत इतिहास रचला आहे.





