Arctic Open 2024 (PV sindhu) : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला आर्क्टिक ओपन 2024 स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत कॅनडाच्या मिशेल लीकडून पराभव पत्करावा लागला आहे. मिशेलने सिंधूला केवळ 37 मिनिटांच्या लढतीत 21-16,21-10 असे पराभूत करून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
PV Sindhu lost to LI 🇨🇦 16-21, 10-21 in comeback match at Arctic Open 2024 🏸
Nothing seems to be working for her 🙁 pic.twitter.com/RDOajKGwJ0
— The Khel India (@TheKhelIndia) October 8, 2024
सप्टेंबर 2024 नंतर भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू प्रथमच कोर्टवर अवतरली होती. मात्र, 29 वर्षांच्या सिंधुला दमदार पुनरागमन करता आले नाही. पॅरिस 2024 ऑलिम्पिकनंतर पीव्ही सिंधूची ही पहिलीच स्पर्धा होती.
सिंधूने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला आघाडी घेतली होती. पण त्यानंतर तिला खूप संघर्ष करावा लागला. दरम्यान, मिचेलने शानदार फटके मारत गुण मिळवत पहिला गेम 21-16 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये मिचेलने सलग गुण मिळवत 21-10 असा सहज विजय नोंदवला.
दरम्यान, ऑलिम्पिकनंतर सिंधुनं आपल्या खेळामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर दिला होता. सिंधूने भारताचे अनुप श्रीधर आणि कोरियन दिग्गज ली सेन इल यांना तिचे नवीन प्रशिक्षक म्हणून देखील नियुक्त केले होते.