Kabaddi World Cup 2025 : भारतीय महिला कबड्डी संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता! चायनीज तायपेईचा 35-28 ने उडवला धुव्वा

Indian Women Team Won Kabaddi World Cup 2025 : बांगलादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने चायनीज तायपेईचा ३५-२८ गुणांनी पराभव करत पुन्हा एकदा जगावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा महिला कबड्डीमध्ये भारताची वाढती ताकद आणि श्रेष्ठता अधोरेखित झाली आहे.
संपूर्ण स्पर्धेत भारताचे निर्विवाद वर्चस्व –
भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेदरम्यान अत्यंत दमदार कामगिरी केली. ग्रुप स्टेजपासून ते फायनलपर्यंत त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. भारतीय महिलांनी ग्रुपमधील सर्व सामने जिंकले. सेमीफायनलमध्ये इराणला ३३-२१ गुणांनी पराभूत करत त्यांनी अंतिम फेरी गाठली, जिथे त्यांनी चायनीज तायपेईला नमवून विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, चायनीज तायपेईनेही लीगचे सर्व सामने जिंकले होते आणि त्यांनी सेमीफायनलमध्ये यजमान बांगलादेशला २५-१८ ने हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता.
Prime Minister @narendramodi has congratulated the Indian Women’s Kabaddi Team for winning the #KabaddiWorldCup2025, making the nation proud.
Mr Modi said that the team has showcased outstanding grit, skills and dedication.
Prime Minister added that the victory of the #Kabaddi… pic.twitter.com/2pwKJdluC2
— All India Radio News (@airnewsalerts) November 24, 2025
कबड्डी क्षेत्रातील दिग्गजांकडून कौतुक –
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल कबड्डी क्षेत्रातील दिग्गजांनी आनंद व्यक्त केला आणि खेळाडूंचे कौतुक केले. हरियाणा स्टीलर्सचे मुख्य प्रशिक्षक मनप्रीत सिंग यांनी संघाची प्रशंसा करताना म्हटले की, “महिला संघाने अशी कामगिरी केली आहे, ज्याचा देशाला अभिमान वाटेल. त्यांचा आत्मविश्वास आणि सांघिक समन्वय शानदार होता. एक माजी भारतीय खेळाडू म्हणून मला माहित आहे की या स्तरावर पोहोचणे किती कठीण आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे खूप अभिनंदन.”
हेही वाचा – Laxmi Ratan Shukla : ‘ही देशाची टीम आहे, कुणाच्या घरची नाही…’, शमीच्या कोचचा आगरकर-गंभीरवर थेट हल्लाबोल
अजय ठाकूर यांच्याकडूनही कौतुक –
पुणेरी पलटणचे मुख्य प्रशिक्षक अजय ठाकूर यांनीही आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “ढाका येथे महिला संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकणे हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांचा फायनलपर्यंतचा दबदबा हे दाखवतो की गेल्या काही वर्षांत महिला कबड्डीने किती मोठी प्रगती केली आहे. या महिला कबड्डी विश्वचषक २०२५ स्पर्धेत यावर्षी ११ देशांनी* सहभाग घेतला होता, जी महिला कबड्डीची जागतिक स्तरावर वाढत असलेली लोकप्रियता स्पष्ट करते. पुढील वर्षांतही ही गती कायम राहील, अशी आशा अजय ठाकूर यांनी व्यक्त केली.





