IND vs PAK : क्रीडा विश्वात खळबळ! पाकचा खेळाडू भारताकडून खेळला अन् फडकवला तिरंगा, पाकिस्तान महासंघ संतापला

Ubaidullah Rajput Controversy in Bahrain kabaddi tournament : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मग तो राजकारणातला असो किंवा खेळाच्या मैदानातला, वातावरण नेहमीच तणावपूर्ण आणि चुरशीचे असते. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका घटनेने क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पाकिस्तानचा स्टार आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू उबैदुल्लाह राजपूत याने चक्क भारताच्या जर्सीत मैदानात उतरून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामुळे आता त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना १६ डिसेंबर रोजी बहरीनमध्ये आयोजित ‘जीसीसी कप’ (GCC Cup) या एका खासगी स्पर्धेत घडली. या स्पर्धेत आयोजकांनी भारत, पाकिस्तान, इराण आणि कॅनडा यांसारख्या देशांच्या नावाने खासगी संघ तयार केले होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे, पाकिस्तानचा आघाडीचा खेळाडू उबैदुल्लाह राजपूत याने या स्पर्धेत पाकिस्तानकडून न खेळता भारताच्या संघाचे प्रतिनिधित्व केले.
Following backlash for playing with an Indian team, Pakistani Kabaddi player Ubaidullah Rajput speaks out in a video statement regarding the Bahrain GCC Cup incident. #TOKSports #UbaidullahRajput #Kabaddi pic.twitter.com/GtrI8xiffy
— TOK Sports (@TOKSports021) December 18, 2025
त्याने केवळ भारताची जर्सीच परिधान केली नाही, तर मैदानात भारताचा राष्ट्रीय ध्वजही फडकवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, त्यानंतर क्रीडा क्षेत्रात वादाला तोंड फुटले आहे.
हेही वाचा – Ishan Kishan Century : इशानने SMAT फायनलमध्ये झळकावले वादळी शतक! हरियाणाच्या गोलंदाजांची उडाली दाणादाण
पाकिस्तान कबड्डी महासंघाचा संताप –
या प्रकारामुळे पाकिस्तान कबड्डी महासंघ (PKF) कमालीचा संतप्त झाला आहे. महासंघाचे सचिव राणा सरवर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. उबैदुल्लाहसह एकूण १६ पाकिस्तानी कबड्डीपटू बोर्डाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता (NOC शिवाय) बहरीनला खेळण्यासाठी गेले होते.
राणा सरवर यांनी स्पष्ट केले की, “ही एक खासगी स्पर्धा होती जिथे देशांच्या नावाने संघ बनवले गेले होते. प्रत्येक संघात त्याच देशाचे मूळ खेळाडू असणे आवश्यक होते. मात्र, उबैदुल्लाहने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणे ही बाब आमच्यासाठी पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ज्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल.”
हेही वाचा – KKR ला मोठा झटका! हुकमी एक्का IPL 2026 सोडून मायदेशी परतणार; काय आहे कारण?
२७ डिसेंबरला होणार निर्णय –
या संपूर्ण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आणि खेळाडूंना शिक्षा सुनावण्यासाठी पाकिस्तान कबड्डी महासंघाने २७ डिसेंबर रोजी एक तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उबैदुल्लाह राजपूतसह इतर १५ खेळाडूंच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करून परदेशात खेळायला गेलेल्या या खेळाडूंवर मोठी बंदी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





