PKL 2025 : प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाचे बिगुल वाजले! ‘या’ तारखेपासून रंगणार सामने

PKL 2025 starts from 29 August : प्रो कबड्डी लीग (पीकेएल २०२५) च्या १२व्या हंगामाला २९ ऑगस्ट २०२५ पासून सुरुवात होणार आहे. लीगचे आयोजक मशाल स्पोर्ट्सने बुधवारी याची घोषणा केली. सध्याचे विजेते हरियाणा स्टीलर्स यावेळी आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. लवकरच या स्पर्धेच्या इतर तपशीलांची घोषणा केली जाईल.
यंदाचा हंगाम आणखी खास ठरणार आहे, कारण ३१ मे आणि १ जून रोजी मुंबईत झालेल्या लिलावात अनेक विक्रम मोडले गेले. लिलावात १० खेळाडूंना एक कोटी रुपयांहून अधिक बोली मिळाली. यामुळे कबड्डीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आता खेळाडूंना कबड्डीतून चांगले पैसे आणि संधी मिळत आहेत.
Brace yourselves… the panga is back 🛡#PKL Season 12 storms in from 29th August 🗓🔥
It’s time to raid, tackle, and roar louder than ever 💥#ProKabaddi pic.twitter.com/F56USW7JYG
— ProKabaddi (@ProKabaddi) July 9, 2025
लवकरच वेळापत्रक होणार जाहीर –
𝗣𝗮𝗻𝗴𝗲𝗯𝗮𝗮𝘇𝗶 𝗯𝗲𝗴𝗶𝗻𝘀 𝘀𝗼𝗼𝗻… but when exactly? 🗓🤔
Here’s a hint just for you, decode it if you can 🕵♂
Stay tuned and drop your guesses below 👇#PKL #ProKabaddi pic.twitter.com/cnxH7jfp2t
— ProKabaddi (@ProKabaddi) July 9, 2025
आयोजकांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या लिलावाद्वारे सर्व १२ फ्रँचायझींनी आपल्या संघांना आणखी मजबूत केले आहे. यामुळे येत्या सामन्यांमध्ये अधिक उत्साह आणि स्पर्धात्मकता पाहायला मिळेल, ज्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल. सध्या, लीगचे सामने कोठे खेळवले जाणार याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आयोजकांनी स्पष्ट केले की, सामन्यांचे ठिकाण आणि कार्यक्रमाची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
हेही वाचा – IND vs ENG : ‘त्यांना काही बोलू नका…’, भारताच्या विजयानंतर योगराज सिंगने गंभीरच्या टीकाकारांना खडसावलं
सहा शहरांमध्ये होऊ शकतात सामने –
सूत्रांच्या माहितीनुसार, यंदा लीग सामन्यांच्या आयोजनासाठी सहा शहरे दावेदार आहेत: विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई, दिल्ली, बंगळुरु आणि मुंबई. ही शहरे निष्ठावान चाहता वर्ग, मजबूत पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक संतुलन यांचे उत्तम मिश्रण दर्शवतात, जे देशव्यापी सहभागासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – Shubman Gill : शुबमन गिल-सारा तेंडुलकर पुन्हा एकत्र? व्हायरल फोटोने चर्चांना उधाण
गतवर्षीच्या हंगामात दमदार कामगिरी करत हरियाणा स्टीलर्सने विजेतेपद पटकावले होते. यंदा पुन्हा एकदा आपले विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने ते मैदानात उतरणार आहेत. मात्र, इतर संघही पूर्ण तयारीनिशी उतरत असून, यंदाचे सामने आणखी रोमांचक होण्याची शक्यता आहे. गतवर्षी पटना संघाने उत्कृष्ट खेळ दाखवला होता, परंतु अंतिम सामन्यात विजय मिळवण्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. यंदा पटना संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरेल.





