IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! वैभव-आयुषसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

IND vs ENG India U19 Squad Announced for England Tour : इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या अंडर-१९ संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा अंडर-१९ संघ पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन बहु-दिवसीय सामने खेळेल आणि त्यासोबतच एक सराव सामनाही खेळेल. या दौऱ्यासाठी आयुष म्हात्रेला कर्णधार बनवण्यात आले आहे. राजस्थानचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.
वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये सोडली छाप –
२४ जूनपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ५० षटकांचा सराव सामना, त्यानंतर पाच सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका आणि इंग्लंड अंडर-१९ विरुद्ध दोन बहु-दिवसीय सामने खेळवले जातील. बिहारमधील समस्तीपूर येथील वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा भारतीय ठरला होता. त्याने बिहारसाठी पाच प्रथम श्रेणी सामने आणि सहा लिस्ट ए सामने खेळले आहेत.
आयुष म्हात्रेची कर्णधारपदी वर्णी –
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
India U19 squad for Tour of England announced.
Details 🔽
— BCCI (@BCCI) May 22, 2025
गेल्या वर्षी चेन्नई येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धच्या पहिल्या युवा कसोटीत सूर्यवंशीने शतक झळकावले होते. दुसरीकडे, १७ वर्षीय म्हात्रेने नऊ प्रथम श्रेणी सामने आणि सात लिस्ट ए सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ९६२ धावा केल्या आहेत. या हंगामात कोपराच्या दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधार ऋतुराज गायकवाडची जागा या सलामीवीराने घेतली होती. मुंबईचा यष्टीरक्षक-फलंदाज अभिज्ञान कुंडूला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
हेही वाचा – MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर
आणखी एक मनोरंजक निवड म्हणजे केरळचा लेगस्पिनर मोहम्मद अन्नान ज्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्ध प्रभावी कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या दोन युवा कसोटी सामन्यांमध्ये अन्नानने १६ विकेट्स घेतल्या आणि त्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. पंजाबचा ऑफस्पिनर अनमोलजीत सिंगलाही संघात स्थान मिळाले आहे.
हेही वाचा – Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर-१९ संघ :
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंग चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, धाजित गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग.





