Abhishek Vaibhav Record : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध रचला इतिहास! अभिषेक-वैभवच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मोडले ३ वर्ल्ड रेकॉर्ड
Abhishek Vaibhav Record : अभिषेक शर्माने वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या १५ चेंडूंमध्ये अर्धशतक आणि ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावत वैभव सूर्यवंशीसोबत भागीदारी करत तीन विश्वविक्रमही मोडले.

Abhishek Sharma Vaibhav Sooryavanshi World Record Partnership vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने १९८ धावा उभारल्यानंतर भारताला काही प्रमाणात संघर्ष करावा लागेल असे वाटत होते. मात्र सलामीवीर अभिषेक शर्मा आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांनी या आव्हानाची अक्षरशः धूळधाण उडवली. पहिल्या चेंडूपासूनच किवी गोलंदाजांवर तुटून पडत या जोडीने अवघ्या ५ षटकांत १०० धावा कुटल्या. अभिषेकने अवघ्या १५ चेंडूंत अर्धशतक झळकावले; हे त्याचे परदेशी भूमीवरील सर्वात जलद, तर आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
अवघ्या १४ चेंडूंत ५० धावांची भागीदारी; मोडला जागतिक विक्रम
अभिषेक आणि वैभव या सलामीच्या जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात स्फोटक सुरुवात करून दिली. दोघांनी अवघ्या २.२ षटकांत (१४ चेंडूंत) ५० धावांची भागीदारी पूर्ण केली, जो आंतरराष्ट्रीय टी-२० मधील सर्वात जलद अर्धशतकी भागीदारीचा विक्रम ठरला. त्यानंतर केवळ ५ षटकांत संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवून त्यांनी कोणत्याही संघासाठी सर्वात जलद शतकी धावसंख्या उभारण्याचा महाविक्रमही आपल्या नावावर केला.
पॉवरप्लेमध्ये ११८ धावा; ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त –
1⃣1⃣8⃣ in 6 overs 🤯
#TeamIndia’s Highest powerplay score in Men’s T20Is ‼️
What a show by the openers 🍿
Updates ▶️ https://t.co/zf4CnZQ8CD
#NZvIND https://t.co/GnxpmRFqzX
— BCCI (@BCCI) October 27, 2026
अभिषेक आणि वैभवच्या या वादळाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पॉवरप्लेचा सर्वात मोठा विक्रम मोडीत काढला. भारतीय संघाने पहिल्या ६ षटकांत तब्बल ११८ धावा चोपल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० च्या इतिहासात कोणत्याही संघाने पॉवरप्लेमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यासह भारताने ऑस्ट्रेलियाचा ११३ धावांचा (स्कॉटलंडविरुद्ध) जागतिक विक्रम इतिहासजमा केला.
३५ चेंडूंत शतक; परदेशातील भारताचे सर्वात जलद शतक –
From New Delhi to Wellington ⏩
Abhishek Sharma never forgets to be in his element 🧘♂️
#TeamIndia | #NZvIND | @OfficialAbhi04 https://t.co/tmyvJ1VzI9
— BCCI (@BCCI) October 27, 2026
अभिषेक शर्माने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ३५ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. भारतासाठी परदेशी भूमीवर झळकावलेले हे सर्वात जलद टी-२० शतक ठरले आहे. अभिषेकने ३८ चेंडूंत तब्बल ११ उत्तुंग षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ११३ धावांची वादळी खेळी साकारली. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे चौथे टी-२० शतक ठरले.
अर्धशतक हुकले तरी वैभवची ४५ धावांची मॅचविनिंग खेळी –
A breathtaking knock of the highest order 👌👌
Abhishek Sharma bags the Player of the Match award 🏅
Scorecard ▶️ https://t.co/zf4CnZQ8CD
#TeamIndia | #NZvIND https://t.co/1vtGoDsnWD
— BCCI (@BCCI) October 27, 2026
गेल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरून अपयशी ठरलेल्या वैभव सूर्यवंशीला सलामीला पाठवण्याचा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरला. वैभवचे अर्धशतक अवघ्या ५ धावांनी हुकले; तो १९ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४५ धावा करून बाद झाला. मात्र, अभिषेकसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी रचलेल्या वादळी पायामुळे न्यूझीलंड संघ सामन्यातून पूर्णपणे बाहेर फेकला गेला आणि भारताने १३.२ षटकांत ४ गडी गमावून ऐतिहासिक विजय साकारला.





