Vladimir Putin : “भारत आतापर्यंत एकाही देशापुढे झुकला नाही, हीच भारताची मोठी ताकद”; पुतिन यांनी अमेरिकेला सुनावले !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार, परराष्ट्र धोरण आणि भारत–रशिया संबंधांबाबत महत्त्वपूर्ण विधान केल्याचे समोर आले आहे.

Russian President Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार, परराष्ट्र धोरण आणि भारत–रशिया संबंधांबाबत महत्त्वपूर्ण विधान केल्याचे समोर आले आहे.
पुतिन यांनी म्हटले की, भारत हा स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेला देश असून तो आपल्या राष्ट्रीय हिताच्या आधारावर निर्णय घेतो. कोणत्याही देशाच्या दबावाखाली भारत आपली भूमिका बदलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Vladimir Putin)
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, भारत आणि रशिया यांच्यातील संबंध ऐतिहासिक आणि मजबूत आहेत, आणि दोन्ही देश भविष्यातही सहकार्य कायम ठेवतील.

Vladimir Putin : “भारत आतापर्यंत एकाही देशापुढे झुकला नाही, हीच भारताची मोठी ताकद”; पुतिन यांनी अमेरिकेला सुनावले !
भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवरून अमेरिका आणि काही पाश्चात्य देशांकडून दबाव असल्याच्या पार्श्वभूमीवर ही टिप्पणी महत्त्वाची मानली जात आहे.या संदर्भात पुतिन यांनी कोणतेही अधिकृत आर्थिक करार किंवा अलीकडील प्रत्यक्ष भेटीचा उल्लेख केलेला नाही. (Vladimir Putin)
पुतिन यांनी चीन आणि भारत यांच्यातील संबंध अधिक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यावेळी पुतिन चीनच्या दाैऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील होते. (Vladimir Putin)
तीन महाशक्तीसोबत आल्या होत्या. त्यानंतर अनेक देशांना मोठ्या मिरच्या लागल्या होत्या. त्यामध्येच आता भारत, चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेबद्दल स्पष्टपणे बोलताना पुतिन दिसले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, भारत आपल्या परराष्ट्र धोरणात “strategic autonomy” म्हणजेच स्वतंत्र निर्णयक्षमता राखत असल्याचे विविध जागतिक घडामोडींमधून दिसते.





