Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 (Rajgir) : – भारताची स्ट्रायकर दीपिकाने शेवटच्या हूटरच्या तीन मिनिटे आधी पेनल्टी स्ट्रोकचे रूपांतर गोलमध्ये करताना महिला आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरिया विरुद्धच्या दुसऱ्या लढतीमध्ये 3-2 असा विजय मिळवून दिला. कालच्या लढतीत भारताने मलेशियाचा 4-0 असा धुव्वा उडविला होता.
Victory under the lights at Rajgir!! 🌟
India finish off the Korean challenge, courtesy of two goals from Deepika and one from Sangita Kumari. 🏑💙Full time:
India 🇮🇳 3-2 🇰🇷 Korea
Sangita Kumari 3′
Deepika 20′, 57′ (PS)
Yuri Lee 34′ (PC)
Eunbi Cheon 38′ (PS)#BiharWACT2024… pic.twitter.com/P3Zbpvnhdf— Hockey India (@TheHockeyIndia) November 12, 2024
पूर्वार्धात भारताने संगीता कुमारी (3 मिनिट) व दीपिका (20 मिनिट) यांच्या गोलच्या जोरावर 2-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या सत्रात युरी लीने (34 मिनिट) भारताचा बचाव भेदण्यात यश मिळविले. त्यानंतर लगेचच कर्णधार युनबी चेऑनने (38 मिनिट) धडक गोल करताना भारताशी 2-2 अशी बरोबरी साधली.
त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र दोन्ही संघांना सातत्याने अपयश येत होते. भारताच्या व दक्षिण कोरियाच्या संघांनी अनेक दमदार चाली रचल्या, मात्र दोन्ही संघांना यश मिळाले नाही. भारताची स्ट्रायकर दीपिकाला 57 व्या मिनिटाला संधी मिळाली त्याचे रूपांतर तिने गोलमध्ये करताना भारताला सलग दुसरा विजय मिळवून दिला. गुरुवारी भारतीय संघासमोर थायलंडचे आव्हान असणार आहे.
पूर्वार्धात भारत जास्त आक्रमक
भारताच्या संगीता कुमारी व दीपिका यांनी धडाकेबाज दोन केले. तिसऱ्या मिनिटाला स्ट्रायकर संगीताने नवनीत कौरने सर्कलच्या आत मारलेल्या शॉटवर रिव्हर्स हिट करताना चेंडू थेट गोलपोस्टमध्ये धाडला. त्यानंतर देखील भारतीय संघाने कोरिया संघाला दबावात ठेवले. 20 व्या मिनिटाला ब्युटी डुंगडुंगच्या पासवर दिपीकाने बचाव भेदताना गोल केला. त्यानंतर केवळ 1 मिनिटात प्रीती दुबेने पुन्हा एकदा रिव्हर्स हिटचा प्रयत्न केला मात्र गोलरक्षक सेओयोन ली बचाव करण्यात यशस्वी ठरली. 24 व्या मिनिटाला देखील संगीताने जोरादार प्रयत्न केला, मात्र तिने मारलेला फटका गोलपोस्टच्या जवळून गेला.
#BiharWACT2024 : भारतीय हाॅकी संघाची धमाकेदार सुरुवात, मलेशियाचा 4-0 ने उडवला धुव्वा…
पेनल्टीचे अपयश कायम
दक्षिण कोरियाने उत्तरार्धात 2 गोल करताना भारतीय खेळाडूंना दबावात आणले होते. मागील लढतीप्रमाणे या लढतीत देखील पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले. भारताला तब्बल 8 पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी सलग 4 पेनल्टी कॉर्नर 39 मिनिटाला मिळाले होते. 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर भारताने कोरियाच्या गोलपोस्टवर सातत्याने आक्रमण केल्याने पेनल्टी कॉर्नर देखील मिळाले मात्र त्यात एकही गोल झाला नाही. शेवटी 57 व्या मिनिटाला दीपिकाला पेनल्टी कॉर्नरवरच गोल करण्यात यश मिळाले.