#BiharWACT2024 : चीन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, उपांत्य फेरीत मलेशियाला केलं पराभूत…

Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 (Rajgir,Malaysia vs China) :- बिहारमधील राजगीर येथे खेळल्या जात असलेल्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य फेरीत चीनने मलेशियाचा 3-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध जपान सामन्यातील विजेत्याशी त्यांचा सामना होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिला गोल चीनकडून झाला जेव्हा डेंग कियानचानने गोलरक्षकाला चकवले आणि 10व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर अवघ्या 7 मिनिटांनी चीनने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. दुसरा हाफही संपला नव्हता तेव्हा चीनने तिसरा गोल करून मलेशियाला बॅकफूटवर आणले. मलेशियाकडून एकमेव गोल 36व्या मिनिटाला झाला जेव्हा संघाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले.
🏑 Full-Time: Semi-Final 1
China 🇨🇳 3️⃣ – 1️⃣ Malaysia 🇲🇾
China marches into the finals with a strong performance! 🏆👏 Malaysia fought back but couldn’t close the gap.#SemiFinals #HockeyIndia #IndiaKaGame #BharatKiSherniyan #BiharWACTRajgir2024 #WomensAsianChampionsTrophy…
— Hockey India (@TheHockeyIndia) November 19, 2024
SEMI FINAL 1 : China 3-1 Malaysia
पहिला गोल : 10′ मिनिट : Deng Qiuchan (डेंग किउचान)
दुसरा गोल : 17′ मिनिट : Fan Yunxia (फैन यूंक्सिया)
तिसरा गोल : 23′ मिनिट : Tan Jinzhuang (टैन जिनज़ुआंग)
चौथा गोल : 36′ मिनिट : Khairunnisa Ayuni Mohd Sharuddin (खैरुन्निसा अयुनी मोहम्मद शारुद्दीन)
चीन तिसऱ्यांदा फायनलमध्ये…
महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात चीनने अंतिम फेरी गाठण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. याआधी 2011 आणि 2016 च्या स्पर्धेतील विजेतेपदाच्या सामन्यात चीनने मजल मारली होती, मात्र एकदा दक्षिण कोरियाकडून पराभव झाला होता तर दुसऱ्या वेळी चीनचा भारतीय संघाकडून पराभव झाला होता. आता या वर्षी अंतिम फेरीत त्याचा सामना भारत विरुद्ध जपान सामन्यातील विजेत्याशी होईल. सध्या दोन्ही संघामध्ये उपांत्यफेरीचा दुसरा सामना सुरू आहे.
चीनने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी अद्याप जिंकली नसली तरी 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चीनने रौप्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत त्यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सकडून 3-1 असा पराभव पत्करावा लागला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्यासाठी चीन प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे कारण ते क्रमवारीत भारत आणि जपान या दोघांपेक्षा वरच्या स्थानावर आहेत, जे दुसऱ्या उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकतील. चीन सध्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे, तर भारत आणि जपान अनुक्रमे 9व्या आणि 11व्या स्थानावर आहेत.





