#BiharWACT2024 : उपांत्य फेरीत ‘भारत-जपान’ आज आमने सामने.! जाणून घ्या, कधी आणि कुठे बघू शकता थेट सामना…

Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 (Rajgir) :- महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 राजगीर, बिहार येथे सुरू आहे. ज्यामध्ये भारताने आपली पकड मजबूत केली आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा फायदाही भारतीय संघाला मिळत आहे. सलीमा टेटे, नवनीत कौर आणि सविता पुनिया या भारताच्या अनुभवी खेळाडू संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकून भारताने अंतिम फेरीच्या दिशेने जोरदार वाटचाल केली आहे. भारत आणि जपान यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना आज 19 नोव्हेंबरला होणार आहे.
जपानला उपांत्य फेरी गाठणे फार कठीण होते. मात्र, चीनने कोरियाचा पराभव केला अन् जपान उपांत्य फेरी पोहचले. मात्र, भारताविरुद्धचा यापूर्वीचा विक्रम लक्षात घेता जपानचा संघ आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल.
The stage is set for an electrifying showdown at the Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 in Rajgir! 🔥
🌟 Semi Final 1: China vs Malaysia
The battle intensifies as these two powerhouses face off for a spot in the final. Who will rise to the occasion?🌟 Semi Final 2:… pic.twitter.com/dod2LuCf35
— Hockey India (@TheHockeyIndia) November 18, 2024
भारत विरुद्ध जपान : हेड टू हेड रेकॉर्ड…
भारत आणि जपान यांच्यात आतापर्यंत एकूण 75 सामने खेळले गेले आहेत. या आकडेवारीत जपानचे वर्चस्व दिसून येत आहे, पण नुकत्याच झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारतानं जपानचा पराभव केला होता. त्यामुळे मानसिकदृष्ट्या भारताचे जपानवर वर्चस्व दिसत आहे.
एकूण सामने: 75
भारत विजयी : 23
जपान विजयी : 36
ड्रॉ : 16
सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पहावे…
भारत आणि जपान यांच्यातील हा उपांत्य सामना आज 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:45 वाजता सुरू होईल. भारतीय दर्शक सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर हा रोमांचक सामना थेट पाहू शकतात. ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी तुम्ही Sony Liv ॲप आणि वेबसाइट वापरू शकता.
T20 Cricket : विराट कोहलीचं रेकॉर्ड उद्ध्वस्त, पाक खेळाडूच्या रडारवर आता रोहित शर्मा…
India vs Japan : टीम स्क्वॉड खालीलप्रमाणे…
भारत : सविता पुनिया, बिचू देवी खारीबाम, उदिता, ज्योति, वैष्णवी विट्ठल फाल्के, सुशीला चानू पुखरामबम, इशिका चौधरी, नेहा, सलीमा टेटे, शर्मिला देवी, मनीषा चौहान, सुनेलिता टोप्पो, लालरेम्सियामी, नवनीत कौर, प्रीति दुबे, संगीता कुमारी, दीपिका, ब्यूटी डुंगडुंग.
जपान : माई फुकुनागा, मियु हसेगावा, मयूरी होरिकावा, साया इवासाकी, हारुका कावागुची, जुनोन कवाई, शिहो कोबायाकावा, यु कुदो, मेई मात्सुनामी, माइको मिकामी, मिज़ुकी मोरिटा, हीरोका मुरायामा, साहो नगाटा, नात्सुमी ओशिमा, हनामी साइटो, अयाना तमुरा, साकी तनाका, माहो उएनो.





