Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 : महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफीमध्ये गतविजेत्या भारतीय संघाने आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. त्यांनी 11 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या पहिल्या सामन्यात मलेशियाचा 4-0 ने पराभव केला. भारताचा पुढील सामना मंगळवारी दक्षिण कोरियाशी होईल. बिहारच्या राजगीरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दुसरा क्वार्टर वगळता बाकीच्या तिन्ही क्वार्टरमध्ये भारताने गोल केले. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये एक तर उर्वरित तिसऱ्या क्वार्टरमध्ये 2 आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एक गोल केला.
भारताकडून संगीता कुमारीने आठव्या आणि 55व्या मिनिटाला, प्रीती दुबेने 43व्या मिनिटाला आणि उदिताने 44व्या मिनिटाला गोल केले. मात्र, मलेशियाविरुद्ध भारताचा गोल फरक जास्त असू शकला असता, पण पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर करण्यात आपले खेळाडू अपयशी ठरले. संपूर्ण सामन्यात भारताला 13 पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु खेळाडूंना केवळ 3 पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करता आले.
Day 1 of the #BiharWACT2024 served up thrilling action! 🏑🔥
Here’s a look at the results from an exciting opening day at the Bihar Women’s Asian Champions Trophy Rajgir 2024.#BiharWACT2024 #IndiaKaGame #HockeyIndia #WomensAsianChampionsTrophy
.
.
.@FIH_Hockey @BSSABihar… pic.twitter.com/U2CuVqH7fl— Hockey India (@TheHockeyIndia) November 11, 2024
पहिल्या क्वार्टरमध्ये मलेशियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये त्यांना पेनल्टी कॉर्नरही मिळाला, पण दोन्ही प्रसंगी त्यांना गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. पहिल्या क्वार्टरमध्ये मलेशियाच्या युसैनी नूरला रेफ्रींनी ग्रीन कार्ड दाखवले. भारत विरुद्ध मलेशिया सामन्यापूर्वी अन्य सामन्यांमध्ये जपान आणि कोरियाचा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला तर ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या चीनने थायलंडचा 15-0 ने धुव्वा उडवला.
भारत विरुद्ध मलेशिया (स्कोरफलक)
8वे मिनिट : भारत विरुद्ध मलेशिया : 1-0 (संगिता कुमारी)
हाॅफ टाईम: भारत विरुद्ध मलेशिया : 1-0
43वे मिनिट: भारत विरुद्ध मलेशिया: 2-0 (प्रीती दुबे)
44वे मिनिट: भारत विरुद्ध मलेशिया: 3-0 (उदिता)
55 वे मिनिट: भारत विरुद्ध मलेशिया: 4-0 (संगिता कुमारी)