#BiharWACT2024 : टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या Final मध्ये धडक; उपांत्य फेरीत जपानचा उडवला धुव्वा…..

Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 (Rajgir,India vs Japan) :- भारतीय महिला हाॅकी संघाने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत जपानचा 2-0 असा पराभव करत महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना चीनशी होईल, ज्यांनी पहिल्या सेमीफायनलमध्ये मलेशियाचा 3-1 असा पराभव केला होता.
Our girls are marching into the Final of Bihar Asian Women’s Championship, 2024.
2 goals in Q4 – One each from Navneet Kaur and Lalremsiami take them into yet another final.
Full Time score:
India 🇮🇳 2 : 0 🇯🇵 Japan
Navneet Kaur (PS) 48′
Lalremsiami 56′#SemiFinals…— Hockey India (@TheHockeyIndia) November 19, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही राजगीर, बिहार येथे खेळवली जात असून भारत विरुद्ध चीन यांच्यातील अंतिम सामना 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. जपानविरुद्धच्या रोमहर्षक उपांत्य फेरीच्या सामन्यात नवनीत कौर आणि लालरेमसियामी यांनी शेवटच्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल करत टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
उपांत्य फेरीचा हा सामना इतका रोमांचक होता की, प्रत्येकी 15 मिनिटांचे पहिले तीन क्वार्टर गोलशून्य राहिले, पण शेवटच्या 15 मिनिटांत जपानचा संघ दबावाखाली कोलमडला. शेवटचा क्वार्टर सुरू झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांनी भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, ज्याचे नवनीत कौरने (Navneet Kaur) गोलमध्ये रूपांतर करत 48 व्या मिनिटाला टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला फक्त 4 मिनिटे उरली होती, तेव्हा 56व्या मिनिटाला लालरेमसियामीने (Lalremsiami) जपानच्या गोलरक्षकाला चकवले आणि गोल करून भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
#BiharWACT2024 : चीन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, उपांत्य फेरीत मलेशियाला केलं पराभूत…
भारत स्पर्धेत अद्याप अंजिक्य…
उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाने या स्पर्धेत पाच साखळी सामने खेळले असून त्यापैकी एकाही सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला नाही. रविवारी अखेरच्या सामन्यात भारतानं जपानला 3-0 ने पराभूत करताना पाचव्या विजयाची नोंद केली होती. त्याआधी पहिल्या सामन्यात मलेशियाचा 4-0 , दुसऱ्या सामन्या कोरियाचा 3-2 , तिसऱ्या सामन्यात थायलंडवर 13-0 तर चौथ्या सामन्यात चीनचा 3-0 असा पराभव केला होता.





